सारस्वत बँकेत १५० पदांसाठी होणार भरती, ८ एप्रिलपर्यंत करा अर्ज

Saraswat Bank Recruitment 2023: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (Marketing And Operations) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

Saraswat Bank Recruitment 2023
सारस्वत बँकेत 150 पदांसाठी होणार भरती (Image Credit – Saraswat Bank )

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी ( (Marketing And Operations) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२३ आहे. सारस्वत बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार http://www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

सारस्वत बँक भरतीचे रिक्त पदासाठी माहिती:

सारस्वत बँकेच्या भरती मोहिमेत एकूण १५० रिक्त जागांवर कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्ग पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक तपशीलांसाठी संपूर्ण भरती अधिसूचना पहा.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक येथे आहे

१० वी पास असणाऱ्यांना RBI मध्ये नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदासाठी भरती, आजच अर्ज करा

सारस्वत बँक भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा:

  • बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.saraswatbank.com वर जा.
  • बँकेच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या करिअरवर क्लिक करा.
  • अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा आणि भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:07 IST
Next Story
१० वी पास असणाऱ्यांना RBI मध्ये नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदासाठी भरती, आजच अर्ज करा
Exit mobile version