सुहास पाटील

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ( SECR), डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल, रायपूर डिव्हीजन ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत १११३ जागांवर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ॲप्रेंटिसशिपसाठी SECR रायपूर डिव्हिजन आणि वॅगन रिपेअर शॉप रायपूरमध्ये वर्ष २०२४-२५ करिता भरती. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –

( I) डीआरएम ऑफिस, रायपूर डिव्हीजन (E०५२०२२०००४८) –

(१) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १६१ पदे (२) टर्नर – ५४ पदे (३) फिटर – २०७ पदे (४) इलेक्ट्रिशियन – २१२ (५) स्टेनोग्राफर (इंग्लिश) – १५ (६) स्टेनोग्राफर (हिंदी) – ८ (७) COPA – १० (८) हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर – २५ (९) मशिनिस्ट – १५ (१०) मेकॅनिक डिझेल – १५

(११) मेकॅनिक रेफ्रिजरेट अँड ए.सी. – २१ (१२) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स – ३५

( II) वॅग रिपेअर शॉप, रायपूर (E१११५२२००००१) –

(१) फिटर – ११० (२) वेल्डर – ११० (३) मशिनिस्ट – १५ (४) टर्नर – १४ (५) इलेक्ट्रिशियन – १४ (६) COPA – ४ (७) स्टेनोग्राफर (इंग्लिश) – १ (८) स्टेनोग्राफर (हिंदी) – १

हेही वाचा >>> यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट

अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग/ माजी सैनिक यांचेसाठी काही पदे नियमानुसार राखीव आहेत. सर्व पदांसाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

पात्रता – (दि. २ एप्रिल २०२४ रोजी) १० वी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट.

वयोमर्यादा – दि. २ एप्रिल २०२४ रोजी १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/अज – २९ वर्षेपर्यंत, विकलांग – ३४ वर्षेपर्यंत) (खुल्या गटातील उमेदवाराचा जन्म २ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००९ दरम्यानचा असावा.).

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/ अज/ महिला/ विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – आलेल्या अर्जातून १० वी आयटीआयमधील गुण एकत्र करून गुणवत्ता यादी बनविली जाईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांना इतर मूळ कागदपत्रांसोबतच मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

फोटोग्राफची स्कॅण्ड/ सॉफ्ट कॉपी – ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आपला रंगीत फोटोग्राफ (जो अर्ज करण्याच्या दिवसाच्या ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा). उमेदवारांनी अपलोड केलेल्या फोटोग्राफच्या आणखी २ कॉपीज कागदपत्र पडताळणी वेळी सादर कराव्या लागतील.

सिग्नेचरची स्कॅण्ड/सॉफ्ट कॉपी – उमेदवारांनी आपली सही अपलोड करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

ऑनलाइन अर्जासोबत स्कॅण्ड करून अपलोड केलेली कागदपत्रे जर विहीत नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेली नाहीत, हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी निदर्शनास आले तर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

अर्जासोबत अपलोड करावयाची इतर कागदपत्रे (स्कॅण्ड केलेली) –

( i) एसएससीची मार्कशिट

( ii) जन्मतारखेचा पुरावा – एसएससी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला

( iii) प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट/ मार्कशिट ज्यात सर्व सेमिस्टर्सचे गुण दर्शविले असतात.

( iv) NCVT ने दिलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा NCVT/ SCVT ने दिलेले प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ( v) अजा/ अज/ इमाव उमेदवारांसाठी जातीचा दाखला

( vi) अपंगत्वाचा दाखला ( PWD उमेदवारांसाठी)

( vii) डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट – माजी सैनिक कोटाकरिता

( viii) ईडब्ल्यूएस दाखला

ऑनलाइन अर्ज https://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरून दि. १ मे २०२४ (२४.०० वाजे) पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी मोबाईल नं. ७०२४१४९२४२ किंवा कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी १७.३० वाजेदरम्यान पुढील पत्त्यावर संपर्क साधा – सिनियर डिव्हिजिनल पर्सोनेल ऑफिस, डीआरएम ऑफिस कॉम्प्लेक्स, वॉल्टिअर गेट, रायपूर, छत्तीसगड – ४९२ ००८.