सुहास पाटील

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( SPMCIL) च्या देशभरातील ९ युनिट्सपैकी एक युनिट सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद (भारत सरकारच्या पूर्ण मालकीची सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायज) येथे पुढील विविध पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ९६. ( Advt. No. SPP/ HR/ Recruitment/२०२३-२४/३४४१)

(१) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) ( Level W-१) – ६८ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३४) (१ पद दिव्यांग कॅटेगरी A व २ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – प्रिंटिंग ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट (जसे की लिथो ऑफसेट मशिन माईंडर/ लेटर प्रेस मशिन माईंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेट मेकिंग/ इलेक्ट्रो प्लेटिंग/प्लेट मेकर कम इम्पोझिटर/ हँड कॉम्पेझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा.

(२) सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन – प्रिंटिंग) (एस-१ लेव्हल) – २ पदे (अज – १, खुला – १).

पात्रता – प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा डिग्री फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

हेही वाचा >>> BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज

(३) सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल) (एस-१ लेव्हल) – ५ पदे (अज – १, ईडब्ल्यूएस – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता – प्रिंटिंग/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटीमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

(४) ज्युनियर (टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन) (डब्ल्यू-१ लेव्हल) – ३ पदे (अज – १, खुला – २).

(५) ज्युनियर (टेक्निशियन/ फिटर) (डब्ल्यू-१ लेव्हल) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

(६) ज्युनियर (टेक्निशियन (वेल्डर)) (डब्ल्यू-१ लेव्हल) – १ पद (खुला).

पद क्र. ४ ते ६ साठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.

(७) फायरमन ( Level W-१) – १ पद (खुला).

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) मान्यताप्राप्त संस्थेकडील फायरमन ट्रेनिंग सर्टिफिकेट, ( iii) उंची – १६५ सें.मी., छाती – ७९-८४ सेंमी, ( iv) प्रत्येक डोळ्याची पूर्ण फिल्ड दृष्टी ( Full Field Vision) असावी, ( v) रंग आंधळेपणा, तिरळेपणा ( squint) इ. नसावा.

(८) ज्युनियर ऑफिस असिस्टंट ( Level B-३) – १२ पदे (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

पात्रता – पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरचे ज्ञान व टायपिंग स्पीड इंग्रजी ४० श.प.मि./ हिंदी ३० श.प्र.मि.

(९) सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज) ( OL/ RM) ( Level A-१) – १ पद (खुला).

पात्रता – हिंदी किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला हिंदी/ इंग्लिश विषय असावेत.) आणि हिंदीतून इंग्लिश/ इंग्लिशमधून हिंदी भाषांतर करण्याचा १ वर्षाचा अनुभव. इष्ट पात्रता – संस्कृत किंवा/ आणि कोणतीही आधुनिक भाषेचे ज्ञान. (हिंदी भाषेतून कॉम्प्युटर चालविण्याचे ज्ञान असावे.)

वयोमर्यादा – (दि. १५ एप्रिल २०२४ रोजी) पद क्र. १, ४ ते ७ साठी १८ ते २५ वर्षे; पद क्र. २, ३ व ९ साठी १८ ते ३० वर्षे; पद क्र. ८ साठी १८-२८ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

कमाल वयोमर्यादा पद क्र. १, ४ ते ८ साठी विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे इमाव/ अजा/ अज – ४० वर्षे).

पद क्र. १ ते ६ साठी दिव्यांग कॅटेगरी D/ HH, ( OL, DW, AAV; ASD, ID, SLD, MI; MD) उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्जाचे शुल्क – खुला/ ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ६००/-; अजा/ अज/ दिव्यांग यांना अर्जाचे शुल्क माफ आहे. परंतु त्यांना रु. २००/- इंटिमेशन चार्जेस भरावे लागतील.

निवड पद्धती – ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. पद क्र. १ ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/ कंट्रोल/ फिटर/ वेल्डर/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन) पदासाठी लेखी परीक्षा १२० प्रश्न, १५० गुण, एकूण वेळ १२० मिनिटे. पार्ट-ए – (१) जनरल अवेअरनेस, (२) अॅरिथमॅटिक अॅबिलिटी, (३) जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, (४) बेसिक इंग्लिश लँग्वेज. प्रत्येकी १५ प्रश्न, १५ गुण, वेळ ६० मिनिटे. पार्ट-बी – (१) संबंधित ट्रेडवर आधारित ६० प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटे.

सुपरवायझर ( TO- Printing/ Tech Control) पदांसाठी – १२० प्रश्न, १५० गुण, एकूण वेळ १२० मिनिटे. पार्ट-ए – (१) जनरल अवेअरनेस, (२) इंग्लिश लँग्वेज – स्किल्स, (३) जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, (४) बेसिक इंग्लिश लँग्वेज. प्रत्येकी १५ प्रश्न/१५ गुण, वेळ ६० मिनिटे. पार्ट-बी – (१) संबंधित विषयावर आधारित प्रश्न – ६०/९० गुण. अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी फेज-१ – प्रथम कॉम्प्युटरवर टाईपिंग टेस्ट इंग्लिश ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. द्यावी लागेल. उमेदवारांनी भाषेचा ऑप्शन देणे आवश्यक.

फेज-२ – ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा १५० प्रश्न, १५० गुण, वेळ एकूण १२० मिनिटे. (१) जनरल अवेअरनेस, (२) कॉम्प्युटर नॉलेज, (३) इंग्लिश लँग्वेज स्किल्स, (४) न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, (५) रिझनिंग अॅप्टिट्यूड. १ ते ५ साठी प्रत्येकी ३० प्रश्न, ३० गुण, वेळ १ ते ३ साठी प्रत्येकी २० मिनिटे आणि ४ ते ५ साठी प्रत्येकी ३० मिनिटे.

ऑनलाइन कॉल लेटर/ अॅडमिट कार्ड https:// cnpnashik. spmcil. com या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. त्यावर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशनच्या वेळी वापरलेला फोटोग्राफ चिकटवावा.

परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी (१) ओरिजिनल कॉल लेटर, (२) मूळ फोटो आयडेंटिटी प्रूफ (आणि त्याची फोटोकॉपी) घेऊन उपस्थित रहावे.

ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदांसाठी कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट हैदराबाद येथे घेतली जाईल.

परीक्षा केंद्र – मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता.

ऑनलाइन अर्ज http:// spphyderabad. spmcil. com या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत (१) फोटोग्राफ (४.५ बाय ३.५ सें.मी.), (२) सिग्नेचर (काळ्या रंगाच्या शाईने) (३ बाय ३ सें.मी. कागदावरील) (३) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (काळ्या किंवा निळ्या शाईने), (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र (१० बाय ५ सें.मी.) ( File size २० kb-५० kb in jpg/ jpeg format) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

एनपीसीआयएलमधील संधी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL), रावतभाटा राजस्थान साईट ( Advt. No. RR Site/ HRM/०१/२०२१) ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांची भरती. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील – एकूण ३३५ (अजा – ५६, अज – ४३, इमाव – ६७, ईडब्ल्यूएस – ३३, खुला – १३६). (१) फिटर – ९४ (२) टर्नर – १३ (३) मशिनिस्ट – १३

(४) इलेक्ट्रिशियन – ९४ (५) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ९४ (६) वेल्डर – १३

(७) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट ( COPA) – १४

पात्रता – (दि. ४ एप्रिल २०२४ रोजी) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट उत्तीर्ण.

प्रशिक्षणाचे ठिकाण – न्यूक्लियर ट्रेनिंग सेंटर ( NTC), रावतभाटा राजस्थान साईट, पोस्ट – अणुशक्ती – ३२३ ३०३, वाया कोटा, राजस्थान.

प्रशिक्षणाचा कालावधी – १ वर्ष.

वयोमर्यादा – ४ एप्रिल २०२४ रोजी १४ ते २४ वर्षे. (इमाव – २७ वर्षे, अजा/अज – २९ वर्षे, दिव्यांग – ३४ वर्षे)

स्टायपेंड – दरमहा रु. ७,७००/- वेल्डर आणि उडढअ ट्रेडसाठी व रु. ८,८५५/- इतर ट्रेडसाठी.

शारीरिक मापदंड – उंची – किमान १३७ सें.मी., वजन – किमान २५.४ कि.ग्रॅ., छाती – किमान ३.८ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

निवड प्रक्रिया – आयटीआय परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जातील.जिल्हा पोलीस अधिकारी यांचेकडील पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सादर केल्यावरच उमेदवारांची नेमणूक केली जाईल. उमेदवारांना प्रथम आपले नाव Establishment Registration No. E08160800303 करिता किंवा http:// www. apprenticeship. gov. in/ या वेबसाईटवर संबंधित ट्रेडकरिता रजिस्टर करणे आवश्यक.

रावलभाटा, राजस्थान NPCIL साईटच्या १६ कि.मी. परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

रजिस्ट्रेशननंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि. ४ एप्रिल २०२४ (१६.०० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत – (१) पासपोर्ट आकाराचा फोटो, (२) उमेदवाराची सही, (३) आयटीआयच्या सर्व सेमिस्टर्सचे मार्कशीट, (४) अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग (असल्यास) संबंधित प्रमाणपत्र, (५) वेल्डर ट्रेडसाठी ८ वीचे मार्कशीट व इतर ट्रेडसाठी १० वीचे मार्कशीट, (६) जन्मतारखेच्या पुराव्यासाठी १० वीचे प्रमाणपत्र, (७) आधारकार्ड.