News Flash

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू

जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर दुर्घटनाग्रस्त

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एका वैमानिकाची प्रकृती गंभीर असून दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

HAL Dhruv हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं असून यामागे तांत्रिक कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथून येत होतं. कठुआचे एसएसपी शैलैंद्र मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला जिल्ह्यातील लखनपूर परिसरात लष्कराच्या जागेवर क्रॅश लँडिंग करावं लागलं.

दुर्घटनेच दोन वैमानिक जखमी झाले होते, त्यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 7:46 am

Web Title: indian army helicopter crashes in jammu kashmir kathua district sgy 87
Next Stories
1 गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री
2 जुन्या वाहनांवर हरितकर आकारण्याचा प्रस्ताव
3 देशाच्या सुरक्षेची सज्जता, शेतकऱ्यांच्या हिताची राष्ट्रपतींकडून ग्वाही
Just Now!
X