News Flash

जम्मू-काश्मीर : बडगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकजण पाकिस्तानचा रहिवासी

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील अरिबाग मचामा परिसरात कालपासून सुरू झालेल्या चकमकीत आज अखेर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर, दहशतवाद्यांशी लढतांना एक जवान जखमी झाला आहे.

जवानांकडून ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते. यातील एक जण पाकिस्तानचा रहिवासी होता. तर दुसरा पुलवामा जिल्ह्यातील होता. अशी माहिती काश्मीरजे आयजी विजयकुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, या भागात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळनंतर जवानांनी परिसरास घेराव दिला व शोधमोहीम सुरू केली होती. जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, त्यास जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. यामुळ सुरू झालेल्या चकमकीत अखेर दोन दहशतवद्यांचा खात्मा झाला. तर एक जवान जखमी झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:10 pm

Web Title: one soldier was injured and two terrorists were killed msr 87
Next Stories
1 अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ, पण…
2 …मग मी तो ‘राष्ट्रद्रोह’ मानतो – संजय राऊत
3 Nikita Tomar Murder Case : आदल्या रात्रीचा तो कॉल, बाचाबाची अन्… ; आरोपीने दिली कबुली
Just Now!
X