केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. तिरुअनंतपूरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे प्रशासन आणि संपत्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला असून श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम ठेवले आहेत. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर काही वर्षांपूर्वी संपत्तीमुळे चर्चेत आले होते. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिराजवळ दोन लाख कोटीची संपत्ती असल्याचे बोलले जाते.

Supreme Court
“सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
dy chandrachud voting appeal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, “या खेपेला…”
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या शाही परिवाराकडे कायम राहणार आहे. तूर्तास तिरुअनंतपूरममधील जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यतेखालील समितीकडे मंदिराचे व्यवस्थापन राहणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

केरळ उच्च न्यायालयाने २०११ साली श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या संपत्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्रावणकोरच्या शाही परिवाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर आठ वर्ष सुनावणी चालली. एप्रिल महिन्यात न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने निकाल सुरक्षित ठेवला होता.

त्रावणकोरच्या शाही कुटुंबाने १८ व्या शतकात श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे पूननिर्माण केले होते. या शाही कुटुंबाने १९४७ च्या आधी दक्षिण केरळ आणि त्याला लागून असलेल्या तामिळनाडूच्या काही भागांवर शासन केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन राजकुटुंबाचे नियंत्रण असलेल्या ट्रस्ट मार्फत सुरु होते.