20 October 2020

News Flash

प्रवासातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने पतीचा मृत्यू, कंडक्टरने मृतदेहासोबत महिलेला खाली उतरवलं

कंडक्टरने अर्ध्या प्रवासात महिलेला खाली उतरवलं

प्रवासात मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या पतीच्या मृतदेहासोबत महिलेला जबरदस्ती खाली उतरवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे. कंडक्टरने अर्ध्या प्रवासात महिलेला खाली उतरवलं. हे दांपत्य बहारिच येथून लखनऊला प्रवास करत होते. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते चालले होते. यावेळी अचानक व्यक्तीची तब्बेत बिघडली आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला.

महिलेने केलेल्या आरोपानुसार, बाराबंकी येथील रामनगर क्रॉसिंगजवळ आपल्याला जबरदस्ती उतरवण्यात आलं आणि मृतदेह घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. बसच्या कंडक्टरने जबरदस्ती महिलेला खाली उतरवलं. इतकंच नाही तर प्रवासाचा कोणताही पुरावा तिच्याकडे नसावा यासाठी तिकीटही काढून घेतलं.

यावेळी तिथे उपस्थित काही लोकांनी बसचा नंबर नोंद करुन घेतला. “मला आधी यासंबंधी काही माहिती नव्हती, पण आता माहिती मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करु आणि संबंधित ड्रायव्हर आणि कंडक्टरवर कारवाई करु”, असं बाराबंकी डेपोचे प्रमुख मनोज कुमार यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 5:04 pm

Web Title: woman forced to get down from bus with husbands body after heart attack sgy 87
Next Stories
1 एमपी, राजस्थानमध्येही भाजपा ‘हात’ मारणार; काँग्रेसला धास्ती
2 आधी लढाऊ विमानं मागे घ्या, मग हवाई मार्ग खुला करु; पाकिस्तानकडून भारताला आवाहन
3 23 वर्षांत पहिल्यांदाच खासदारांनी करून दाखवला ‘हा’ पराक्रम
Just Now!
X