मागील काही महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. ट्विटर, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि गुगल यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्माचारी कपातीचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता डिझनेही जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मेटा, ट्विटरनंतर गुगलही १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार, सुंदर पिचाईंची ईमेलद्वारे घोषणा

यासंदर्भात बोलताना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर म्हणाले, करोनामुळे आम्हाला मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे आम्ही जगभरातील सात हजार कर्माचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं आमच्यासाठी सोप्पा नाही. मला माझ्या कर्मचाऱ्याची प्रतिभा आणि त्यांच्या कामाच्या समर्पणाबद्दल अभिमान आहे. या निर्णयामुळे त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल? याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागतो आहे.

हेही वाचा – ट्विटर, मेटा, गुगलनंतर आता Amazon चा दणका! हजारो कर्माचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, CEO म्हणाले, ” या तारखेपासून…”

डिझनेमध्ये जगभरात सुमारे दोन लाख २० हजार कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी एक लाख ६६ हजार कर्मचारी एकट्या अमेरिकेत कार्यरत आहेत. यापैकी जगभरातील सात हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय डिझनेने घेतला आहे.

हेही वाचा – Amazon Layoffs : अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरकपातीस सुरुवात, भारतात १००० जणांची नोकरी जाण्याची भीती

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि amazon.com इंकने जवळपास १० हजार कर्माचाऱ्यांची कपात सुरु केली. तसंच ट्विटर इंकने त्यांच्या ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक जणांना कामावरून काढून टाकलं. तर सिस्को सिस्टम इंकने मागच्या आठवड्यात नोकरी आणि कार्यालय कमी करण्याची घोषणा केली. हाय ड्राईव्ह निर्माता सिगेट टेक्नोलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही जवळपास तीन हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After twitter and google disney will cut 7000 employe in world by ceo bob iger spb
First published on: 09-02-2023 at 10:20 IST