Premium

हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

Joe Biden on Hamas attack on Israel
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलं. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच इस्रायलला सर्वोतपरी मदतीची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जो बायडेन म्हणाले, “मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, अमेरिका इस्रायलच्या सरकारला आणि तेथील लोकांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला बचावाचा आणि इस्रायलच्या जनतेची सुरक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

बायडेन यांनी दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल बेंजामिन नेतान्याहू यांनीही आभार व्यक्त केले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

हल्ला प्रतिहल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी

दरम्यान, हमासने केलेल्या या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये १९८ जणांचा मृत्यू झाला, तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा : इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये मृतांचा खच; १९८ जणांचा मृत्यू, १६०० जखमी…

इस्रायलकडून हमासच्या तळांवर हल्ले होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त शब्दांत युद्धाची घोषणा केली. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना या युद्धात अद्दल घडवली जाईल. त्यांना असा धडा शिकवला जाईल, ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल”, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: America president joe biden comment on hamas attack on israel pbs

First published on: 08-10-2023 at 08:53 IST
Next Story
अफगाणिस्तानातील भूकंपात ३२० ठार