आपलं प्रेम मिळवण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही. अनेकजण कुटुंबाचा विरोध झुगारून एकमकेांशी लग्न करतात. तर काही प्रेमी युगुल हे एकत्र येण्यासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. बिहारमधील जमुई येथील असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने प्रेम करत असलेल्या मुलाशी लग्न करण्यासाठी सर्वांना थक्क करणारा निर्णय घेतलाय. घरामध्ये एकीकडे तिच्या लग्नाची तयारी चालू असताना दुसरीकडे तिने घरातून प्रियकरासोबत पळ काढलाय. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर या प्रेमी युगुलांच्या भूमिकेमुळे सगलेच अवाक् झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार बिहारमधील जमुई येथील आहे. येथे एका तरुणीच्या लग्नाची तयारी चालू होती. लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते. या तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न अन्य ठिकाणी लावून देण्याचं ठरवलं होतं. तशी तयारीदेखील झाली होती. प्रत्यक्ष लग्नापूर्वीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि विधी पार पाडण्यास सुरुवातही झाली होती. त्याचाच एक भाग म्हणून या तरुणीला हळदही लावण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेलं असताना ही तरुणी आपल्या प्रेमीसोबत घरातून पळून गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar girl run away ahead of wedding and get married with boyfriend video went viral prd
First published on: 04-03-2024 at 16:48 IST