ओटावा/न्यूयॉर्क : कॅनडामधील खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) अशी तिघांची नावे असून, त्यांच्यावर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हत्येत सहभागी असलेल्या इतरांनाही लवकरच अटक केली जाईल, असे सांगण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात आहे का, याचा तपास करत असल्याचे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी  शुक्रवारी सांगितले. १८ जून २०२३ ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर ४५ वर्षीय निज्जरची हत्या करण्यात आली होती. अटक केलेले तिघेही हत्येसाठी भारत सरकारने नेमलेल्या पथकाचे सदस्य असल्याचा कॅनडाचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. हत्याप्रकरणात इतरही अनेक लोकांचा समावेश असून, प्रत्येकाचा छडा लावू, असे ‘इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम’चे प्रभारी अधिकारी अधीक्षक मनदीप मुकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मोठी बातमी! जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा यांना एसआयटीकडून अटक

पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या स्वरूपाविषयी तसेच निज्जरच्या हत्येमागील हेतूबद्दल आम्ही बोलू शकत नसल्याचे ‘आरसीएमपी’चे सहाय्यक आयुक्त डेव्हिड तेबोल यांनी सांगितले. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे, अटक केलेल्या तिघांचा केवळ हत्येच्या कटापुरताच सहभाग नसून, त्यात भारत सरकारचा असलेल्या संबंधांची चौकशीही समाविष्ट असल्याचेही ते म्हणाले.

हा कॅनडाचा अंतर्गत प्रश्न

भुवनेश्वर : निज्जर हत्येवरून कॅनडाच्या राजकारणामध्ये जे काही घडत आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. भारताची प्रतिमा जगभरात पूर्वीपेक्षा खूप उंचावली आहे, त्याला कॅनडा अपवाद आहे असे ते म्हणाले. अटक केलेले तिघेही भारतीय नागरिक असून गेल्या तीन ते पाच वर्षांपासून ते कॅनडाचे रहिवासी म्हणून राहत आहेत. या प्रकरणात भारताशी समन्वय साधणे आव्हानात्मक आणि त्यापेक्षाही कठिण झाले आहे. शीख समुदायाच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada police arrested three in nijjar murder case zws