मालवाहू जहाज थेट पुलावर आदळल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत एकूण २ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी तर तीन जण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातानंतर एका बससह एकूण पाच वाहनं नदीत बुडाली आहेत. या धक्कादायक दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील गुआंझू शहरातील नदीवर एक पूल आहे. या पुलावर मालवाहू जहाज आदळले. यामुळे या पुलाचा काही भाग चक्क नदीत कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा काही वाहने पुलावरून जात होती. त्यामुळे जहाज पुलावर आदळल्यानंतर पुलावरून जाणारी काही वाहनेदेखील नदीत बुडाली. या वाहनांचा सध्या शोध घेतला जातोय. पुलावर आदळलेले जहाज हे फोशान येथून गुआंझू येथे जात होते. दुर्घटनाग्रस्त पुलाचे नाव ‘लिक्सिनशा पूल’ असे आहे. पुलावर आदळलेले मालवाहू जहाज रिकामे होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cargo ship hits bridge in china two dead three missing prd
First published on: 22-02-2024 at 14:08 IST