scorecardresearch

Premium

“मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

हमासच्या दहशतवाद्यांकडून महिलांवर कौर्याची परिसीमा गाठणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Noa Argamani viral video israeli student
इस्रायलची २५ वर्षीय विद्यार्थिनी नोआ अर्गामनीचं हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आहे. (फोटो-व्हायरल व्हिडीओ/एक्स)

शनिवारी सकाळी गाझा पट्टीतील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांकडून महिलांवर कौर्याची परिसीमा गाठणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीडित महिला जीवाच्या आकांताने सुटकेसाठी विनवणी करत आहेत. मात्र, हमासचे दहशतवादी अमानुष अत्याचार करताना दिसत आहेत.

दरम्यान, इस्रायलची २५ वर्षीय विद्यार्थिनी नोआ अर्गामनीचं हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हमासचे दहशतवादी पीडितेला एका दुचाकीवरून अपहरण करून घेऊन जाताना दिसत आहेत. तर पीडित तरुणी जीवाच्या आकांताने ओरडत आहे. “मला मारू नका” अशी विनवणी ती करत आहे.

Indian Army SSC Tech Recruitment 2024
भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज
Emmanuel Macron
“२०३० पर्यंत फ्रान्सच्या विद्यापीठांत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट”, प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितली योजना
Canada New Visa Policy
विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?
demolition of Babri ftii campus ram mandir pune fir registered marathi news
फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावणाऱ्यांचा छडा, ‘या’ विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा- “हमास दहशतवाद्यांकडून बलात्काराचा शस्त्रासारखा वापर”, अनेक महिला बेपत्ता झाल्यानंतर ‘इस्रायल वॉर रुम’कडून भीती व्यक्त

‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, नोआ अर्गामनी ही ज्यू सण (सुकोट) साजरा करण्यासाठी गाझा पट्टीजवळील एका रेव्हमध्ये सहभागी झाली होती. इथे ती ट्रान्स म्युझिक महोत्सवाचा आनंद घेत होती. यावेळी हमास दहशतवाद्यांनी गर्दीवर गोळीबार करत रॉकेट हल्ला केला. यावेळी जमावाने रस्ता दिसेल तिकडे पळायला सुरुवात केली. या गोंधळात पीडित नोआ हमास दहशतवाद्यांच्या हाती लागली. तिचा प्रियकर अवि नॅथन याचंही पॅलिस्टिनी दहशतवाद्यांनी अपहरण केलं.

व्हायरल व्हिडीओमध्ये हमासचे दहशतवादी नोआचं अपहरण करून घेऊन जाताना दिसत आहेत. तर नोआ अर्गमनी ओरडताना दिसत आहे. “मला मारू नका! नाही, नाही, नाही,” असं ती म्हणत आहे. तर तिचा प्रियकर अवि नॅथनलाही दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. या क्रूर अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont kill me israeli student kidnapped by hamas terrorist viral video noa argamani rmm

First published on: 08-10-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×