एपी, देर अल-बलाह (गाझा पट्टी)

इस्रायलच्या तेल अविव या शहरावर हमासने रविवारी रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली किंवा नाही याबद्दल तातडीने माहिती मिळालेली नाही. इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धात इस्रालयने गाझावर गेल्या सहा महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई, सागरी आणि जमिनीवरून हल्ले केले आहेत. त्या तुलनेत हमासने अनेक महिन्यांमध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या रॉकेटने हल्ला केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas rocket attack on israel amy
First published on: 27-05-2024 at 06:22 IST