लखनौ आयआयएमच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना चार तासांत नोक ऱ्यांचे प्रस्ताव

४५७ विद्यार्थ्यांच्या तुकडीला अवघ्या चार दिवसांत नोकरीचे प्रस्ताव मिळाले आहेत.

लखनौच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना या वर्षी अवघ्या चार तासांत नोक ऱ्या मिळाल्या आहेत. या संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे, की आमच्या संस्थेचा हा एक विक्रम झालेला आहे. ४५७ विद्यार्थ्यांच्या तुकडीला अवघ्या चार दिवसांत नोकरीचे प्रस्ताव मिळाले आहेत.एकूण १५७ देशी व परदेशी कर्मचारी भरती संस्थांनी या भरती मोहिमेत भाग घेतला होता. आयआयएमएल या संस्थेच्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी संधी दिली असून त्यात विपणन, अर्थ, सल्लासेवा या विभागात त्यांना काम करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. पुरवठा, संचालन, साखळी  समूह, व्यवस्थापन, मनुष्यबळ , बाजारपेठ संशोधन यातही त्यांना नोकरीचे प्रस्ताव देण्यात
आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Iim lucknow students get 100 percent jobs proposal

ताज्या बातम्या