रफाह सीमा आणि इजिप्तला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला असल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. तसेच या कारवाई दरम्यान २० दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचेही इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

द इंडिनय एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सोमवारी रात्री रफाह बॉर्डरला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर सैन्य कारवाई केली. या कारवाईदरम्यान हमासचे २० दहशतवादी मारले केले. तसेच इस्रायली सैन्याने तीन बोगदेदेखील उधवस्त केले. या कारवाईनंतर आता इस्रायलने गाझा पट्टीतील दक्षिण भागावर नियंत्रण मिळवले आहे.

Mumbai, sea wall, footpath, Aksa Beach Beach, Malad, heavy rains, Maharashtra Maritime Board, erosion, CRZ rules, environmentalists, National Green Tribunal, Mumbai news, marathi news, latest news,
मुंबई : अक्सा किनाऱ्यावरील समुद्री पदपथ खचला, नागरिकांना प्रवेशबंदी
brave officers of the Indian Army reached Dras-Kargil on a motorcycle
भारतीय लष्कराच्या जाँबाज अधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले द्रास-कारगील!
farmer killed in tiger attack
चंद्रपूर : दबा धरून बसलेल्या वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला
jammu kashmir
Terrorist Attack In Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; एक जवान जखमी
Laborer died, mudslide, Malad,
मालाडमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचा मृत्यू, दोघे जखमी
Jammu and Kashmirs Doda Terrorist Attack
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद
army convoy kathua
कठुआत लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा कसा झाला? जम्मू-काश्मीरमधील सततच्या दहशतवादी हल्ल्यामागे कोणाचा हात?
jammu kashmir terrorists attack
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद; चार जखमी

हेही वाचा – विश्लेषण : इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामाला उशीर का? चर्चेचे घोडे नेमके कुठे अडते?

महत्त्वाचे म्हणजे इस्रायली माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या एका व्हिडीओत या भागात इस्रायलचे झेंडेही दिसून आले आहेत. मात्र, इस्रायली सैन्याने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही रफाह सीमेला लागून असलेल्या दक्षिण गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला आता सात महिने पूर्ण होत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ३४ हजार ६०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि जवळपास ७८ हजार जखमी झाले आहेत. गाझाच्या २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख लोक विस्थापित होऊन एकट्या रफाह या दक्षिणेकडील शहरामध्ये एकवटले आहेत. हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात जवळपास १२०० जणांचा बळी गेला. त्याशिवाय २५३ जणांना ओलिस धरण्यात आले. त्यापैकी सुमारे १३० जणांची अजूनही काही खबरबात नाही. विशेष म्हणजे दीर्घकाळ युद्धविराम व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.