नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘अमेठीवापसी’ची चर्चा होऊ लागली आहे. केरळमध्ये राहुल यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ‘भाकप’च्या नेत्या अ‍ॅनी राजा या डाव्या आघाडीच्या उमेदवार असतील.राहुल गांधी यांनी वायनाडमधून पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अ‍ॅनी राजा यांच्याशी लढत द्यावी लागेल. ‘इंडिया’तील प्रमुख नेत्याची पत्नी राहुल गांधी यांच्या विरोधात लढत असेल तर चुकीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचेल. म्हणूनच ‘भाकप’च्या वतीने राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक न लढवण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ते पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवण्याची चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाशी झालेल्या जागावाटपामध्ये अमेठी व रायबरेली हे दोन्ही परंपरागत लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाले आहेत. राहुल यांनी अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी अमेठीवासीयांची इच्छा असल्याचे जाहीर विधान काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi will again contest the lok sabha elections from amethi amy