पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती दिवसोंदिवस वाढतच आहेत. मात्र केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादने गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या अंतर्गत आणल्यास सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय तेल व वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी यासंदर्भातील संकेतही दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर सर्वात उच्च दराचा जीएसटी लागू केला तरी सध्याच्या किंमतीपेक्षा नवे दर हे अर्ध्याहून कमी होती. "राजासारखे वागू नका, जमीनीशी नातं सांगणारं नेता व्हा", मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला "सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून."#PMModi #Modi #BJP — LoksattaLive (@LoksattaLive) February 24, 2021 सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जातो. दोन्ही करांचा बोजा एवढा जास्त आहे ३५ रुपयांचे पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९० ते १०० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलं आहे. २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत पेट्रोलचे दर ९७ रुपये प्रति लीटर इतके आहेत. असेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास दिल्लीमध्ये काल म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी पेट्रोलेच दर ९०.९३ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ८१.३२ रुपये प्रति लीटर इतके होते. यामध्ये अनुक्रम केंद्राने ३२.९८ रुपये प्रति लीटर तर राज्य सरकारने ३१.८३ रुपये प्रति लीटर कर आकारला. देशामध्ये जीएसटी लागू असताना ही परिस्थिती आहे. जीएसटी एक जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. त्यावेळेच राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर करांच्या रुपाने अधिक अवलंबून असल्याने जीएसटीमधून इंधनाला वगळण्यात आलं होतं. आता सीतारामन यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. नक्की वाचा >> …म्हणून वाढलेत पेट्रोल, डिझेलचे भाव; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सोनियांना महाराष्ट्राचं उदाहरण देत सुनावलं पेट्रोल जीएसटी अंतर्गत आलं तर. जर पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या अंतर्गत आणण्यात आलं तर देशातील सर्व राज्यांमधील इंधनाचे दर समान होतील. इतकच नाही जीएसटी परिषदेने कमी स्लॅबमध्ये पेट्रोलियम उत्पादनांना स्थान दिल्यास इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील. सध्या भारतामध्ये चार प्रकारचा जीएसटी आकारला जातो. यामध्ये सर्वात कमी पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार प्रकार आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार करांच्या नावाखाली इंधनावर १०० टक्के कर वसूल करत आहे. त्यामुळे सर्वाधिक जीएसटी लावला तरी पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खालीच राहील. .म्हणून मोदींच्या सभेनंतर हुगळीमधील मैदानावर शिंपडण्यात आलं गंगाजल २२ फेब्रुवारी रोजी मोदींच्या हुगळीमधील सभेसाठी हॅलीपॅड उभारायला शेकडो वर्षांपूर्वीची वृक्ष कापल्याचा आरोप#PMModi #Modi #TMC #BJP #WestBengal #WestBengalElection2021 #MamataBanerjee — LoksattaLive (@LoksattaLive) February 24, 2021 पेट्रोलियम मंत्री म्हणतात प्रयत्न सुरु. कच्च्या तेलापासून निर्माण होणाऱ्या पदार्थांच्या किंमती कमी होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही प्रधान यांनी म्हटलं आहे. “आम्ही सातत्याने जीएसटी काऊन्सीलला पेट्रोलियम पदार्थांना कर सवलत देण्यासंर्भांत विनंती करत आहोत. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. मात्र अंतिम निर्णय त्यांचा असणार आहे,” असं प्रधान यांनी एएनआयशी बोलताना म्हणाले आहे. सर्वाधिक कमाईचे माध्यम. पेट्रोलियम उत्पादने ही राज्यांसाठी कर वसुलीचे आणि राजस्व म्हणजेच रेव्हेन्यू मिळवण्याचं प्रमुख साधन आहे. त्यामुळेच जीएसटी परिषद इंधनाला सर्वात मोठ्या स्लॅबमध्ये ठेऊन त्यावर उपकर लावू शकते. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये पेट्रोलियम क्षेत्राने सराकरी तिजोरीमध्ये दोन लाख ३७ हजार ३३८ कोटी रुपयांचे योगदान दिलं आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजार २८१ कोटी केंद्राचा वाट तर ८४ हजार ५७ कोटी राज्यांचा वाटा होता. वर्ष २०१९-२० मध्ये राज्य आणि केंद्राने पेट्रोलियम क्षेत्रामधून एकूण पाच लाख ५५ हजार ३७० कोटी मिळवले. हे सरकारच्या कमाईच्या १८ टक्के इतका तर राज्यांच्या कमाईच्या सात टक्के इतका आहे. खुलं पत्र : "मोदीजी, रोजगार मागणाऱ्यांच्या हाती तुम्हीच मंदिराच्या वर्गणीचं पावती पुस्तक द्या" "जिथे जिथे हे तरुण आंदोलन करत आहेत तिथे तिथे जाऊन त्यांच्या हातात हे पावती पुस्तक द्या. त्यानंतर तुम्ही पाहा."#PMModi #Modi #unemployment — LoksattaLive (@LoksattaLive) February 24, 2021 राजस्थानमध्ये सर्वाधिक कर. संपूर्म देशामध्ये राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक म्हणजेच ३६ टक्के व्हॅट लागू करण्यात आला आहे. त्यानंतर तेलंगणा ३५.२ टक्के व्हॅट आकरतो. पेट्रोलवर ३० टक्क्यांहून अधिक व्हॅट आकारणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या समावेश आहे. डिझेलवर सर्वाधिक कर आकारणाऱ्यांमध्ये ओदिशा, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. नुकतेच पश्चिम बंगाल, राजस्थान, मेघालय, आसाम आणि नागालॅण्डने इंधनावरील करामध्ये कापात केलीय.