भारत आणि पूर्व नेपाळच्या कोपऱ्यात जगातील सर्वांत उंच पर्वत आहेत. हिमालयातील या भागांना निसर्गाने भरभरून दिलंय. चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंगमध्ये दुर्मिळ ऑर्किडची झाडंही आहेत. इथल्या हिरव्यागार टेकड्यांवर लाल पांडा स्वच्छंदीपणे बागडतही असतात. पण येथे राहणाऱ्या लोकांचं जीवन इतरांपेक्षा जरा कठीण आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माऊंट एव्हरेस्टजवळ जन्मलेल्या पासांग शेर्पा या शेतकऱ्याची मका आणि बटाट्याची चांगली पिके होती. परंतु, येथील जंगली प्राण्यांनी येथे उच्छाद मांडल्याने ही पिके नष्ट होऊ लागली. अखेर, या पारंपरिक वनस्पतींचा शेर्पा यांनी त्याग केला आणि ज्या पिकांना अधिक महत्त्व नाही त्यांची लागवड केली. पिवळ्या फुलांचं झुडूप असलेल्या सदारहित राहणाऱ्या आर्गेली या जंगली झुडपाची लागवड करण्यात आली. कुंपण आणि सरपणासाठी याचा वापर केला जातो. परंतु, ही लागवड त्यांच्यासाठी पैशांचा पाऊस पाडेल याची कल्पना नव्हती. जगातील अत्यंत गरीब भाग आता अत्यंत श्रीमंत देशांना कच्चा माल पुरवतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This country provides raw materials of japan currency sgk
First published on: 16-04-2024 at 12:38 IST