केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताची अर्थव्यवस्था, तसंच येणारी आव्हानं, मागच्या दहा वर्षात झालेली अर्थव्यवस्थेची प्रगती या सगळ्या विषयांवर आजच्या एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात भाष्य केलं आहे. केंद्रीय निर्मला सीतारमण या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये समर्थपणे अर्थखात्याची धुरा सांभाळत आहेत. तिसऱ्या टर्ममध्येही आम्हीच येणार आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तिसऱ्यांदा मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास त्या मंत्रिमंडळात निर्मला सीतारमण यांना हेच खातं दिलं जाऊ शकतं. अर्थखातं त्यांनी मागच्या पाच वर्षांत समर्थपणे सांभाळून दाखवलं आहे. या सगळ्यावर आणि भविष्यातल्या योजनांवर त्या चर्चा करत आहेत. हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडीओवर.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union finance minister nirmala sitharaman express adda scj
First published on: 28-02-2024 at 18:52 IST