गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि मध्य भारतातील लहरी हवामानामुळे विमाने विलंबाने उड्डाण करत आहेत. दिल्लीतील वातावरणातही सातत्याने घट होत असल्याने तिथं सर्वत्र धुकं पसरलं आहे. परिणामी अनेक विमान उड्डाणे उशिराने होत आहेत. याचा परिणाम म्हणून दिल्ली ते गोवा असा मार्ग असलेल्या इंडिगो विमानाने १४ जानेवारी तब्बल १३ तास उशिराने उड्डाण घेतले. १३ तासाच्या विलंबाबत माहिती देत असताना पायलटवर एका प्रवाशाने हल्ला केला आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता इंडिगो प्रशासनाने संबंधित प्रवाशाविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.

१४ जानेवारी रोजी 6E 2175 हे विमान दिल्लीतून गोव्यात जात असताना दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विमान उड्डाणाला १३ तास उशीर झाल्याने सर्व प्रवासी संतापले होते. त्यातील एका प्रवाशाने चक्क विमान पायलटवरच हात उगारला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून इंडिगो विमानाविरोधातील तक्रारीतही वाढ झाली आहे. दरम्यान, पायलटवर हात उगारणाऱ्या प्रवाशाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

| Unable to board AC coach, angry passenger breaks train door’s glass Viral video
“रेल्वेच्या एसी डब्यात चढता येईना, चिडलेल्या प्रवाशाने रागात फोडली दरवाज्याची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Furious gaur tosses man in the air after he provokes
“आ बैल मुझे मार!” चिडलेल्या रानगव्याने व्यक्तीला तीन वेळा उचलून आपटले, थरारक Video Viral
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंडिगो विमानातील कॅप्टन फ्लाईट १३ तास उशिरा असल्याची माहिती देत होता. त्याचदरम्यान, तिथे असलेल्या एका प्रवाशाने पायलटला ठोसा मारला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. त्यानुसार, या संबंधित प्रवाशावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर, काही प्रवाशांनी इंडिगोच्या विलंबाकडे लक्ष वेधले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार आली असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

व्हिडीओत काय दिसतंय?

व्हिडिओमध्ये कॅप्टन विमान विलंबाबाबत घोषणा करताना दिसत आहे. अचानक, पिवळ्या रंगाची हुडी घातलेला एक प्रवासी अचानक कॅप्टनकडे धावते आणि त्याच्या कानशिलात लगावतो. या झटापटीत कॅप्टनचा सहकारी (फ्लाईट असिस्टंट) मधे पडतो. तर, दुसरा प्रवासी या प्रवाशाला आवरण्याचा प्रयत्न करतो. “सर, तुम्ही असं करू शकत नाही”, असं कॅप्टनला वाचवणारा फ्लाइट अटेंडंट व्हायरल व्हिडिओमध्ये असे म्हणताना ऐकू येत आहे. अनेक प्रवासी प्रवाशाच्या वर्तनाचे समर्थन करत आहेत. तर, विलंबासाठी इंडिगोला दोष देत आहेत.

पोलीस काय म्हणाले?

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E2175 चे सह पायलट अनुप कुमार आणि सुरक्षा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी साहिल कत्रिया नावाच्या एका प्रवाशाबद्दल तक्रार दिली आहे. त्याने १५ जानेवारी रोजी सहपायलटवर हल्ला केला. त्याने विमानात गैरवर्तन करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. यासंदर्भातल सहपायलट अनुप कुमार यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली आहे.

इंडिगोकडून समितीची स्थापना

दरम्यान, या प्रकरणी इंडिगोने याप्रकरणी चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीकडून आता याप्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान विमान कंपनी या प्रवाशावर ३० दिवसांची बंदी घालू शकते. समितीला ३० दिवसांच्या आत निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर, या संबंधित प्रवाशावर किती काळ बंदी घालता येईल, हे ठरवता येईल.