नवी दिल्ली : निवडणुकीमधील गैरप्रकार टाळण्यासाठी रोकड, मद्य आणि अमली पदार्थाच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने देशभरात केलेल्या कारवायांमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त झाल्याचे आयोगाने जाहीर सोमवारी जाहीर केले. यात सर्वाधिक, २ हजार ६९ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ साली लोकसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाच्या देखरेखीत ३,४७५ कोटी रुपयांची एकूण जप्ती करण्यात आली होती. यंदा पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वीच हा विक्रम मोडीत निघाला असून एक मार्चपासून दररोज सरासरी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल यंत्रणांनी जप्त केला आहे. यामध्ये सर्वाधिक, ४५ टक्के वाटा हा अमली पदार्थाचा आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : गोवा, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणाचे पारडे जड?

काळया पैशाच्या वापरामुळे सर्व उमेदवारांना समान संधी न मिळता अधिक संसाधने असलेला पक्ष किंवा उमेदवाराला अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही जप्ती म्हणजे लोकसभा निवडणुका आमिषांशिवाय आणि निवडणूकविषयक गैरप्रकारांशिवाय पार पाडण्याच्या, तसेच सर्वांसाठी समान संधी सुनिश्चित करण्याच्या आपल्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे आयोगाने म्हटले आहे. अमली पदार्थाची जप्ती ही यावर्षी जानेवारी व फेब्रुवारीत करण्यात आलेल्या एकूण जप्तीच्या ७६ टक्के असून, निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या बऱ्याच आधी आयोगाने या धोक्यावर लक्ष केंद्रित केले होते.

हेलिकॉप्टर तपासाचे समर्थन

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचे निवडणूक आयोगाने समर्थन केले आहे. निवडणूक काळात कोणत्याही नेत्याचे हेलिकॉप्टरसह कोणतेही वाहन तपासणे ही नियमित प्रक्रिया असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरच्या तपासणीवरून बॅनर्जी यांनी आयोगावर टीका केली होती.

कारवाईचा धडाका

मुद्देमाल           किंमत

अमली पदार्थ       २,०६९ कोटी

मद्य             ४८९ कोटी

रोकड             ३९५ कोटी

अन्य वस्तू          १,६९७ कोटी

एकूण             ४,६५० कोटी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worth rs 269 crores of drugs seized in the last one and a half months zws