Ayodhya South Korea Relation : राम मंदिरात २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर धार्मिक नगरी अयोध्येचा चेहरामोहरा बदललेला दिसत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. त्यात आता अयोध्येचे दक्षिण कोरियाशीही खूप जुने आणि सलोख्याचे नातेसंबंध समोर आले आहेत.

कोरियन पौराणिक कथेनुसार, सुमारे २००० वर्षांपूर्वी अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न हिने ४,५०० किलोमीटर प्रवास करून कोरियाला पोहोचली. त्यानंतर तिने उत्तर आशियाई देशात गया (कोरिया) साम्राज्याची स्थापना करणारा राजा किम सुरो याच्याशी लग्न केले. त्यानंतर राजकुमारी सुरीरत्न ही राणी हिओ ह्वांग-ओके या नावाने प्रसिद्ध झाली. भारतात फारच क्वचित लोकांना या दंतकथेविषयी माहिती आहे; पण दक्षिण कोरियातील सुमारे ६० लाख लोक; जे स्वत:ला सुरीरत्नाचे वंशज मानतात, ते अयोध्येलाही आपली मातृभूमी मानतात. त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा घरी बसून ऑनलाइन माध्यमातून मोठ्या कुतूहलाने पाहिला.

China claim on Arunachal Pradesh and its hegemony strategy continues
लेख: चीनचा कावा वेळीच ओळखा..
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Meet First Woman Bula Choudhary To Swim Across All Seven Seas and etched her name in history
सात समुद्र पार करणारी ‘दर्याची राणी’; कोण आहे बुला चौधरी? जाणून घ्या…
west bengal politics
पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून डाव्या पक्षांत मतभेद; सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे?

दरम्यान, दक्षिण कोरियातील सुरीरत्नाचे वंशज आता भव्य नवीन राम मंदिराचा परिसर जवळून पाहण्यासाठी अयोध्येला भेट देण्याची प्रतीक्षा करीत आहेत. करक कुळातील अनेक सदस्य दरवर्षी अयोध्येत राणी हिओ ह्वांग-ओक यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या क्वीन हिओ मेमोरियल पार्कमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भेट देतात. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर २००१ मध्ये उत्तर प्रदेश सरकार आणि दक्षिण कोरिया सरकार यांच्या परस्पर सहकार्याने राणी हिओ ह्वांग-ओक यांचे स्मारक उभारण्यात आले होते.

सेंट्रल करक क्लॅन सोसायटीचे सरचिटणीस किम चिल-सू म्हणाले, “अयोध्या आमच्यासाठी खूप खास आहे. कारण- आम्ही ते आमच्या आजीचे घर म्हणून पाहतो.” क्वीन हियो मेमोरियल पार्कपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरात २२ जानेवारी रोजी झालेल्या रामलल्लाच्या नवीन मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यात ते सहभागी झाले होते. २,००० चौरस मीटर परिसरात पसरलेल्या या उद्यानात ध्यानमंदिर, राणी आणि राजाला समर्पित मंडप, मार्ग, कारंजे, भित्तीचित्रे व ऑडिओ-व्हिडिओ अशा सुविधा आहेत. मंडप एका विशिष्ट कोरियन शैलीत बांधलेले आहेत; ज्यामध्ये टाइल्सचे तिरके छत आहे.

त्यावर ते पुढे म्हणाले, “आम्ही स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी अयोध्येला जातो आणि यावेळी नवीन राम मंदिर पाहण्यासाठी जाण्याचा आमचा विचार आहे. आम्ही हा सोहळा ऑनलाइन पाहिला आणि खूप आनंद झाला. मी जुन्या तात्पुरत्या मंदिरात गेलो नाही. परंतु, मी या प्रकरणातील वादाबद्दल वाचले आहे. फेब्रुवारीमध्ये इतर २२ जणांसह ते अयोध्येत जाण्याची योजना आखत आहेत, असे त्यांनी दक्षिण कोरियाहून फोनवर पीटीआयला सांगितले.

सामगुक युसा या प्राचीन कोरियन इतिहासाच्या मजकुरानुसार, राणी हियो ह्वांग-ओके ही गिम्हे हियो कुटुंबांची पूर्वज म्हणून ओळखली जाते. ही राणी आयुता येथून इसवी सन ४८ मध्ये कोरियाला आली होती. ती अजूनही करक कुळातील गिम्हे हियो कुटुंबांची पूर्वज माता म्हणून पूजनीय आहे.

दक्षिण कोरियाच्या दूतावासाने 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एक्सवरून भारताचे अभिनंदन केले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की, ४८ एडी मधील अयोध्येतील राणी श्रीरत्न (हेओ ह्वांग-ओके) आणि गया (कोरिया) येथील राजा किम सुरो आणि यांच्यातील वैवाहिक मिलनावर आधारित कोरिया-भारत संबंधांसाठी या ठिकाणाला मोठे प्रतीकात्मक महत्त्व आहे.

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी स्मारकाच्या विस्तारासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

दक्षिण कोरियात राजदूत म्हणून काम केलेले भारतीय मुत्सद्दी एन. पार्थसारथी यांनी सुरीरत्न यांच्या जीवनावर आधारित ‘द लिजेंड ऑफ अयोध्या प्रिन्सेस इन कोरिया’ ही कादंबरीही लिहिली होती. तिचे कोरियन भाषेत “बी डॅन ह्वांग हू’ किंवा सिल्क प्रिन्सेस, या नावाने भाषांतर करण्यात आले होते. नंतर नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने या कादंबरीवर आधारित लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित केले.