PM Surya Ghar Yojana: ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’नंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्य घर मोफत योजनेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये लोकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवरून या योजनेबाबत अनेक ट्विट केले. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर पॅनेल बसवले जातील आणि काय लाभ मिळतील याबाबत सांगितले. आता ‘ पंतप्रधान सूर्य घर योजना’ ही ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’पेक्षा किती वेगळी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान सूर्योदय योजना जाहीर करण्यात आली

खरे तर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की,”देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले जातील. एक कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गरीब कुटुंबांचे वीज बिल कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – बाळ जन्मताच का रडते? बाळाच्या रडण्याचे कारण कसे ओळखावे?

हेही वाचा – तरुणाने केली पोमॅटोची शेती! एकाच रोपाला येतात बटाटा अन् टोमॅटो, पाहा Viral Video

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात माहिती दिली

पंतप्रधान सूर्योदय योजनेबाबत एवढीच माहिती समोर आली, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांनी या योजनेबाबत अधिक माहिती मिळाली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, पंतप्रधान सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. याशिवाय या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यामुळे काय फायदे होतील हेही त्यांनी सांगितले.

मग ही पंतप्रधान सूर्य घर योजना काय आहे?

हेही वाचा – Gobi Manchurian Ban : गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी! कसा तयार झाला ‘हा’ भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ?

आता पंतप्रधान मोदींनीही तेच सांगितले आहे, परंतु यावेळी पीएम सूर्योदय योजनेऐवजी त्याचे नाव ‘पंतप्रधान सुर्य घर: मोफत वीज योजना’ असे लिहिले आहे. या योजनेत सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे पीएम मोदींनी सांगितले. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊन १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ते म्हणाले की, “सौर पॅनलच्या किंमतीसाठी जनतेवर कोणताही बोजा पडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. यामध्ये लोकांना जास्तीत जास्त अनुदान दिले जाईल. तळागाळात योजना लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात छतावरील सौर पॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळेल, वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल.”

हेही वाचा – “महिला सर्जनशीलतेने काम करत नाही..”; १९३८ मध्ये वॉल्ट डिस्नेने नाकारला होता महिलेचा नोकरीचा अर्ज, ते Rejection Letter आले चर्चेत

एबीपी न्युजने दिलेल्या माहितीनुसार, “आता या सर्व गोष्टींनी हे सिद्ध होते की, ‘या दोन्ही योजना एकमेकांशी संबंधित आहेत, घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याला पीएम सूर्योदय योजना, तर मोफत वीज योजनेला “पीएम सूर्य घर योजना” असे नाव देण्यात आले आहे.”

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is difference between surya ghar scheme and pradhan mantri suryodaya scheme snk
First published on: 14-02-2024 at 19:27 IST