आर टी ओ अंतरंग : वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम

प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहित असणे आवश्यक आहे

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे .

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे . त्यानुसार दिनांक 1 जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेगुलेशन लागू करण्यात आलेले आहेत . यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत . त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.
३३) प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहित असणे आवश्यक आहे . कलम ११२, ११३, १२१,१२२,१२५,१३२,१३४,१८५, १८६,१९४,२०७.
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत कलम १९४ : विधीग्राह्य वजनापेक्षा जास्त वजन भरणे.
१) जर एखादी व्यक्ती वाहनामध्ये विधीग्राह्य क्षमतेपेक्षा जास्त माल भरत असेल तर अशा व्यक्तींला कमितकमी दोन हजार रुपये दंड आणि प्रत्येक जास्ती टनाला एक हजार रुपये दंड तसेच वाहनांतील जास्त माल कमी करण्यासाठी लागणारा खर्च भरावा लागतो.
२)एखाद्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या वाहनाच्या चालकाने त्याला वाहन वजन काट्यावर नेण्याचे आदेश गणवेश परिधान केलेल्या अधिकार्याने दिले असतां जर तसे केले नाही तर त्याला पी तीन हजार पर्यंत दंड आहे.
कलम २०७ :नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्यामुळे वाहन अटकाऊन ठेवणे
जर वाहन विना नोंदणी किंवा लायसेन्स नसतांना किंवा योग्य प्रकारचे परमिट नसतांना सदर वाहन अटकाऊन ठेवण्याचे अधिकार पोलिस अधिकारी किंवा मोटार वाहन विभागाचे अधिकारी यांना आहे. – समाप्त
संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Motor vehicle driving rules and regulations

ताज्या बातम्या