लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील एकूण ४२८ जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ दोन टप्प्यांमधील ११५ जागांवरील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ चा नारा दिला होता. त्यांना देशात ४०० जागा मिळणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. यावर राजकीय आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्यापाठोपाठ अमेरिकेतील निवडणुकांचे अभ्यासक, राजकीय संशोधक तथा रणनीतीकार इयान ब्रेमर यांनीदेखील भारतातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. इयॉन ब्रेमर यांनी काही वेळापूर्वी एनडीटीव्हीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ३०५ (+/- १०) जागा मिळतील.” म्हणजेच भाजपा जास्तीत जास्त ३१५ किंवा कमीत कमी २९५ जागा जागा जिंकू शकते.

इयान ब्रेमर हे यूरेशिया समूहाचे संस्थापक आहे. ही एक रिस्क अँड रिसर्च कन्सल्टन्सी (जोखीम आणि संशोधन) कंपनी आहे. ब्रेमर यांना भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाविषयी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “जगभरातील निवडणुकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतंय की, भारतातल्या सार्वत्रिक निवडणुका स्थिर आहेत. अन्यथा जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्या निवडणुकांमध्ये आम्ही अनेक समस्या पाहिल्या आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात भू-राजकीय (जियोपॉलिटिकल) अस्थिरता पाहायला मिळतेय. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अपेक्षित असलेलं जागतिकीकरणाचं भविष्य सध्या तरी दिसत नाहीये. राजकारणाने जागतिक बाजारपेठेतच प्रवेश केला आहे.”

ब्रेमर म्हणाले, सध्या जगभरातल्या राजकारणात भारतातल्या निवडणुका सर्वात स्थिर वाटत आहेत. “अन्यथा इतरत्र आम्हाला समस्याच समस्या दिसतायत. भारताच्या निवडणुकांबाबत यूरेशियन रिसर्च ग्रुपचा अंदाज आहे की, भाजपाला देशात २९५ ते ३१५ जागा मिळू शकतात. असं झाल्यास भाजपाचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय असेल.” भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.

हे ही वाचा >> Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

भाजपाच्या रणनीतीपुढे विरोधक फसले : प्रशांत किशोर

दरम्यान, भाजपाला यंदाही बहुमत मिळेल असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, लोकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी असली हा राग व्यापक स्वरुपात दिसलेला नाही. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजपाला २७२ जागा मिळणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, तेव्हा त्यांनी २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपाच्या बाजूने दावे केले जात आहेत. ४०० जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us political scientist ian bremmer says bjp will win 305 seats in lok sabha election 2024 asc
First published on: 22-05-2024 at 21:00 IST