Premium

इराणच्या नौदलात आधुनिक डेलमन युद्धनौका, इस्रायलची चिंता वाढणार?

डेलमन डिस्ट्रॉयर ही एक युद्धनौका असून ती ९५ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद आहे.

Deilaman destroyer
इराणने कॅस्पियन समुद्रात डेलमन युद्धनौका तैनात केली आहे. (सांकेतिक फोटो)

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटना यांच्यातील युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या दोघांत युद्ध सुरू असताना इराण समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी ‘गॅलेक्सी लीडर’नावाच्या व्यापारी जहाजाचे अपहरण केले आहे. इस्रायलला विरोध म्हणून हुथी बंडखोरांनी ही कारवाई केलेली आहे. या घडामोडी गडत असताना आता इराणच्या नौदलात ‘डेलमन डिस्ट्रॉयर’ नावाचे मोठी युद्धनौका दाखल झाली आहे. हे जहाज इरणने कॅस्पियन समुद्रात तैनात केले आहे. याच पार्श्वभूमीवर या युद्धनौकेचे वैशिष्य काय आहे? या युद्धनौकेमुळे इस्रायलला चिंता करण्याची गरज आहे का? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युद्धनौका ९५ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद

इराणमधील उत्तरेकडील एका गावाच्या नावावरून या युद्धनौकेले डेलमन डिस्ट्रॉयर (Deilaman Destroyer) असे नाव देण्यात आले आहे. हे विनाशक एकूण १४०० टन वजनाचे असून ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असताना ते टॉरपीडोसच्या माध्यमातून हल्ला करू शकते. डेलमन डिस्ट्रॉयर ही एक युद्धनौका असून ती ९५ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद आहे. एका वृत्तावाहिनीनुसार ही युद्धनौका आपल्या लक्ष्याचा शोध घेऊ शकते, त्याची ओळख पटवू शकते तसेच आवश्यक असल्यास हवा, भूपृष्ठावरील धोक्यांशीदेखील सामना करू शकते. या जहाजावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे. तसेच हेलिकॉप्टर वाहून नेण्याचीही या जहाजात क्षमता आहे. Mehrnews com संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार हे जहाज मोवज श्रेणीतील जहाज आहे. ‘जेरुसलेम पोस्ट’ या वृत्तसंकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार डेलमन डिस्ट्रॉय हे स्वत: इराणने तयार केले आहे. या डिस्ट्रॉयरची रचना ही जमरान डिस्ट्रॉयरप्रमाणे आहे. जमरान डिस्ट्रॉयरचा २०१० साली इराणच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. मोवज श्रेणीतील हे पाचवे जहाज आहे. तेहरान टाईम्सच्या वृत्तानुसार मोवज श्रेणीतील अन्य युद्धनौकांची नावे देना, साहंद, दामावंद, जमरान अशी आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iran navy deilaman destroyer ship entered know what effect on israel prd

First published on: 29-11-2023 at 15:35 IST
Next Story
नेपोलियनला भारत का जिंकायचा होता?