Sita & Akbar Controversy कोलकाता उच्च न्यायालयाने प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देवता आणि समाजातील विख्यात व्यक्तींची नावं देण्याबाबत समज दिल्यानंतर दोन सिंहांची नोंद सीता आणि अकबर अशी करणाऱ्या सर्वोच्च वनाधिकाऱ्याला त्रिपुराने गेल्या आठवड्यात निलंबित केले. अधिकृत नोंदीनुसार, आजपर्यंत भारतातील अनेक प्राणीसंग्रहालयांत अनेक वर्षांपासून प्राण्यांना अशाच प्रकारे नाव देण्याची पद्धत रूढ आहे, परंतु यामुळे आजपर्यंत अशा प्रकारची कोणतीही समस्या उद्भवलेली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील इतर प्राणी संग्रहालयात आजपर्यंत प्राण्यांना नावं देण्याची पद्धत कशी सुरु आहे, हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

निकाल देताना न्यायमूर्ती काय म्हणाले?

१९७० च्या दशकात, गुजरातच्या जुनागढ प्राणीसंग्रहालयाने मुमताज नावाच्या सिंहिणीची जोडी राम नावाच्या सिंहाबरोबर तयार केली होती. तर १९८० साली म्हैसूर प्राणीसंग्रहालयात वाघीण राधा आणि वाघ कृष्ण यांच्या शावकांना मुमताज आणि सफदर अशी नावं देण्यात आली होती. कोलकाता (तत्कालीन कलकत्ता) उच्च न्यायालयाने १९८० मध्ये स्वातंत्र्यसैनिकांची नावं नो-गो लिस्ट (नावे दिली जाणार नाहीत अशी यादी) मध्ये समाविष्ट केली होती, २००४ मध्ये याच जुनागढ प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या सिंहिणीला आझादी असे नाव देण्यात आले होते.

सिंहाचे नाव सम्राट अशोक ठेवाल का?

त्रिपुराच्या प्राणिसंग्रहालयातून पश्चिम बंगालमध्ये हस्तांतरित केलेल्या सीता आणि अकबर या दोन सिंहांच्या नामकरणाच्या विरोधातील याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य म्हणाले, ‘इथे फक्त सीतेचा प्रश्न नाही. सिंहाला अकबर नाव देण्याचेही मी समर्थन करत नाही. उद्या सिंहाचे नाव सम्राट अशोक ठेवाल का?’ असाही प्रश्न विचारत ही नामकरण पद्धत न्यायमूर्तींनी रद्दबातल ठरवली.

जुनागढ प्राणीसंग्रहालयातील अशोक आणि विश्वामित्र

गुजरातच्या जुनागढ प्राणीसंग्रहालयाने १९९१ मध्ये सिंहाचे नाव अशोक ठेवले होते. ओडिशाच्या नंदनकानन प्राणीसंग्रहालयाने १९८१ आणि १९९४ मध्ये दोन वाघांची नावे अशोक ठेवली होती. याशिवाय त्याच संग्रहालयात २००० साली अशोक नावाच्या वाघाने आणि तनुजा वाघिणीने समशेर नावाच्या शावकाला जन्म दिला होता. योगायोगाने तनुजा ही विश्वामित्र नावाच्या वाघाची कन्या होती, त्याचे नाव वैदिक सप्तर्षींपैकी एक होते. विश्वामित्र नावाच्या वाघाच्या भावाचे नाव वसिष्ठ होते.

प्राणीसंग्रहालयातील लोकप्रिय सीता आणि अकबर

सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या नॅशनल स्टडबुक्स २०१८ च्या आवृत्तीत १९५० च्या दशकापासून बंदिवासात असलेल्या वाघ आणि सिंह यासारख्या लुप्तप्राय प्रजातींच्या वंशावळीची माहिती आहे. सीता आणि अकबर ही दोन्ही नावे भारतातील प्राणीसंग्रहालयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुंबईच्या भायखळा प्राणीसंग्रहालयाने १९९६ मध्ये सिंहिणीला सीतेचे नाव दिले. १९७४ पासून कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, पंजाब, बिहार, राजस्थान आणि ओडिशा येथील १२ प्राणीसंग्रहालयांनी किमान १३ वाघिणींना सीता/ सिता/ सीथा अशी नावे दिली आहेत. २०११ मध्ये सिंह अतुल आणि सिंहिण सोनिया यांनी नर शावकाला जन्म दिला. हैदराबाद प्राणीसंग्रहालयात या शावकाचे नाव अकबर ठेवण्यात आले. अकबराच्या एका बहिणीचे नाव लक्ष्मी होते. १९८१ मध्ये म्हैसूर प्राणीसंग्रहालयाने अमर, अकबर आणि अँथनी अशी नावे वाघांच्या तीन पिल्लांना दिली होती. मंगळुरू प्राणीसंग्रहालयाने २०१६ मध्ये असेच केले होते.

प्राणीसंग्रहालयातील मार्जार कूळ आणि त्यांची ओळख

नोंदींनुसार भारतीय प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील डझनभर नावे ब्रह्मा, शिव, कृष्ण, बलराम, शंकर, पार्वती, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, गणेश, कार्तिक, गंगा, राधा, यशोदा, कुंती, , रुक्मिणी, राम, लव, कुश इ. यांसारख्या धार्मिक आणि पौराणिक देवी देवतांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. दलाई लामा यांचे तेन्झिन हे नाव २०२१ मध्ये दार्जिलिंग प्राणीसंग्रहालयाने हिम बिबट्याला दिले होते.

प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राण्यांना तीन प्रकारची ओळख असते: त्यांच्या ट्रान्सपॉन्डर मायक्रोचिपवरील क्रमांक, राष्ट्रीय स्टडबुकमधील क्रमांक आणि स्थानिक घरातील (प्राणीसंग्रहालयातील) नाव. कोलकाता प्राणीसंग्रहालयातील माजी प्राणीरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार “मार्जार कुळातील प्राणी असो किंवा वानर, एखाद्या बंदिवान प्राण्याला वैयक्तिकरित्या हाताळण्याची आवश्यकता असते त्यावेळेस त्याच्याशी जवळीक वाढविण्यासाठी एक घरगुती नाव आवश्यक असते.”

नावामागील हेतू शोधणे हे हास्यास्पद

सेंट्रल झू ऑथॉरिटी (CZA) आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (WII) माजी संचालक पी आर सिन्हा यांनी एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आणून दिली ती म्हणजे स्टडबुकमध्ये दिलेल्या नावांच्या माहितीनुसार प्राण्यांची देवाणघेवाण किंवा प्रजननाच्या संदर्भातील निर्णय घेतले जात नाहीत, प्राण्यांची नावे काहीही संदर्भ नसतानाही ठेवली जातात, त्यामागील हेतू शोधणे हे हास्यास्पद आहे.

१९५५ मध्ये मध्य प्रदेशच्या रीवा प्राणीसंग्रहालयाने मोहन आणि बेगमच्या पिल्लाचे नाव राधा ठेवले होते, तिचे आई-वडील दोघेही जंगलात पकडले गेले होते, राधा ही भारतातील प्राणीसंग्रहालयात जन्मलेली पहिली वाघीण म्हणून ओळखली जाते. ती परंपरा कायम राहिली. पुणे प्राणीसंग्रहालयाने कैकयी या वाघिणीला जन्मलेल्या दोन शावकांना सुलतान (१९९२) आणि मस्तानी (१९९४) अशी नावं दिली होती. २०१२ मध्ये आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे हसीना वाघिणीच्या तीन शावकांची नावे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा ठेवण्यात आली होती.

नावांमागील पौराणिक संदर्भ

कधीकधी प्राणीसंग्रहालय पौराणिक कथांचे अनुसरण करतात. वाघ करण (कर्ण) आणि अर्जुन यांचा जन्म २००१ साली दिल्लीतील वाघीण कुंतीच्या पोटी झाला. त्याचप्रमाणे, वाघ गणेश (१९९१) आणि वाघीण सरस्वती (१९९२) यांचा जन्म छत्तीसगडच्या भिलाई येथे वाघ शंकर आणि वाघीण पार्वती यांच्या पोटी झाला. त्यानंतर ते विभक्त झाले. १९९९ मध्ये, वाघ गणेश आणि वाघीण पार्वती यांचे विकास नावाचे एक आणि वाघ गणेशालाच वाघीण सरस्वतीपासून विष्णू, कृष्ण आणि दुर्गा अशी तीन पिल्ले झाली होती.

बंदिस्त प्रजननासाठी प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राणी निवडण्याच्या मार्गात त्यांची नावे कधीच आली नाहीत. १९७८ मध्ये, वाघीण सीतेला पंजाबच्या छतबीर प्राणीसंग्रहालयातील वाघ बलराम याच्यासोबत ठेवण्यात आले होते. १९९१ मध्ये पुणे प्राणीसंग्रहालयाने वाघीण लक्ष्मीची टायगर अँथनीसोबत जोडी केली होती.

याउलट, पौराणिक कथा किंवा इतिहासातील जोडप्यांची नावे भावंडानाही देण्यात आली आहेत, राम आणि सीता (१९९५, मध्य प्रदेश, शिवपुरी), सावित्री आणि सत्यवान (१९८७, नंदनकानन); आणि बाजीराव आणि मस्तानी (२००३, मुंबई- बोरिवली).

काही प्राण्यांच्या नावांचे अजब नमुने:
१९७६: म्हैसूरमध्ये शूर्पणखा या वाघिणीचा जन्म कृष्ण या वाघापासून झाला.
१९७८: वाघीण बेगमला कोलकाता येथे वाघ शिवाने जन्म दिला.
१९९७: जिप्सी आणि रझिया या वाघिणींचा जन्म पुण्यात लक्ष्मी या वाघिणीच्या पोटी झाला.
१९९८: कोलकाता येथे वाघीण गायत्रीच्या पोटी वाघ बादशाचा जन्म झाला.
२००४: वाघ कैफचा जन्म छत्रपती संभाजीनगर/औरंगाबादमध्ये सीता या वाघिणीच्या पोटी झाला.
२०१०: जुनागढमध्ये सिंह तौकीरचा जन्म सिंहीण तुळशी आणि सिंह सरजित यांच्या पोटी झाला.
२०११: वाघ शिवाचा जन्म कर्नाटकातील बन्नेरघट्टामधील वाघिण मेनका हिच्या पोटी झाला.
२०१६: वाघ सुलतानचा जन्म भिलाईमधील वाघीण गंगा हिच्या पोटी झाला. आणि सिंह शंकराने इटावामध्ये सिंह सुलतानला जन्म दिला.
जॅकी नावाचा वाघ आणि कारगिल नावाचा सिंहही आहे. शिवाय, कलकत्ता हायकोर्टाने सुचविल्याप्रमाणे नावे बदलणे वाटते तितके सोपे नाही. “प्राणी आणि त्याचा पालक (त्याला हाताळणारा) यांच्यातील संबंध त्याच्या हाताळणीसाठी महत्त्वपूर्ण असतो. प्राण्यांकडून एका रात्रीत नवीन नावांना प्रतिसाद मिळणे कठीण असते. म्हणूनच अनेकदा प्राण्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत वापरलेले नाव त्यांना हाताळण्यासाठी चांगले ठरते,” असे गुजरातमधील प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकांनी सांगितले.

काही नावांवर अलीकडच्या घटनांचा प्रभाव आहे. १९९९ मध्ये कानपूर प्राणीसंग्रहालयाने सिंहाचे नाव कारगिल ठेवले होते. १९८३ मध्ये, ज्या वर्षी ‘हिरो’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला, त्यावेळी पटना प्राणीसंग्रहालयाने वाघाला जॅकी असे नाव असे दिले. १९९४ मध्ये भारताने मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर १९९६ मध्ये कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीचे नाव ऐश्वर्या ठेवण्यात आले. २००२ साली, बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाने द्रविड वाघाच्या दोन पिल्लांची नावं अनुक्रमे तेंडुलकर आणि कल्पना चावला अशी ठेवली. प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील नावे सामायिक करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चित्रपट तारे आणि क्रिकेटर्सचे वर्चस्व आहे.

काही प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राण्यांना कदाचित अधिक समर्पक नाव दिले गेले. १९६७ मध्ये, जंगलातून पकडलेल्या वाघाला दिल्ली प्राणीसंग्रहालयात जिम (जिम कॉर्बेट यांच्या नावावरून) असे नाव देण्यात आले. १९८४ मध्ये कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात शेरूच्या रूपात आणखी एक जंगली वाघ आला. जुनागढ प्राणीसंग्रहालयाने १९९६ मध्ये सिंहाच्या दोन नर पिल्लांना मुफासा आणि सिम्बा अशीच नावं दिली.

अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

असेही काही पर्याय…

दिल्ली प्राणिसंग्रहालयाच्या माजी संचालकानी एक मार्मिक प्रश्न विचारला, जेसिका सिंहिण आणि डायना वाघीण यांच्यामुळे जुन्या जखमांची खपली निघणार आहे का? आझादीचे (सिंहिण) पुढे काय होईल? प्राणीसंग्रहालयातील मार्जार कूळात फक्त (वाघ) छेडीलाल (लखनऊ), शम्मी किंवा पम्मी (छतबीर) अशीच नावे शिल्लक राहतील का?
यावर एक चांगला पर्याय म्हणजे प्राणीसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राण्यांना त्यांच्या प्रमुख वर्तन वैशिष्ट्यांनुसार मानवी समाजातील नावं देणे, असे ते नमूद करतात. राष्ट्रीय स्टडबुकमध्ये झगरू (१९६८, दिल्ली), पेटू (१९८७, वनविहार), फत्तू (१९९७, छतबीर) आणि छोटू (२००३, छतबीर) नावाचे वाघ आहेत. छतबीर प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला २००३ मध्ये चोरनी असे नाव देण्यात आले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sita akbar akbars sister lakshmi do the names akbar sita tendulkar really make a difference to animals svs
First published on: 29-02-2024 at 14:08 IST