माणसाच्या स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण मानसोपचारात स्वभावालाही औषध आहे. हे उपचार करून घेण्यासाठी सर्वात आधी मनाची तयारी लागते. रुग्ण व डॉक्टर या दोघांनीही वेळ, चिकाटी व प्रामाणिकपणा ठेवला तर काही वर्षांनी हा आजार बरा होऊ शकतो.

व्यक्ती बहिर्मुखी आहे की अंतर्मुखी, प्रज्ञाजीवी आहे कीनाही, किती ओजस्वी आहे, नतिकता कशी आहे, आक्रमकता किती आहे, अपरिचित परिस्थितीत कशी वावरते इत्यादी गुणांवरून स्वभाव कळतो. स्वभाव कळल्यावर व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असेल याचा साधारण अंदाज लावता येतो.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Chaitra Navratri Maha Ashtami Rare Yog Siddhi & Ravi To Make These 5 Rashi Extremely Rich
आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?

स्वभावांचे वर्गीकरण
स्वभावाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. मोघम सांगायचे म्हणजे- ‘शिस्तबद्ध आणि भित्रेपणा’, ‘मानसिक स्थर्य’ आणि ‘अंतर्मुख-संशयीपणा’ या तीन गुणांचे किती प्रमाण आहे, यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव साधारण कळतो. थोडय़ा प्रमाणात शिस्त चांगली असते. पण अती झाले तर काम करायला खूप वेळ लागतो, काही बदल झाला तर सहन होत नाही आणि इतरांनी केलेले काम पटत नाही. आजूबाजूच्या लोकांना सारख्या सूचना देऊन, असमाधान दाखवून ते हैराण करत असतात. सुरक्षित राहण्यासाठी थोडा भित्रेपणा असावा लागतो, पण अतिभित्रेपणा असलेली व्यक्ती नेहमी कुणाच्यातरी छात्रछायेखालीच राहतात आणि त्यांचा विकास होत नाही.
मानसिक स्थर्य नसलेली व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. यांच्यात लहरीपणा, हळवेपणा, प्रसंगी खोटे बोलण्याची सवय असते. आपल्याकडे लक्ष केंद्रित असावे असे त्यांना वाटत असते. या स्वभावामुळे हे लोक कशातही टिकत नाहीत, असमाधानी होतात आणि अमली पदार्थाकडे त्यांचा कल बनतो. त्यांच्या संवेदना एखाद्या वादळासारख्या इतरांना भिरकावू शकतात. त्याउलट अंतर्मुख व्यक्तींना इतरांशी संवाद साधावा, असे वाटतच नाही. त्यांना िनदा-प्रशंसा कशाचेही काही वाटत नाही. इतर लोक त्यांना मुद्दामहून त्रास देतात, टोचून बोलतात, गरव्यवहार करतात असे त्यांना काही वेळा वाटते. त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पण घेतात व टोकाचा संघर्ष करायला मागे-पुढे पाहात नाहीत.

स्वभाव दोष म्हणजे काय?

कुठलाही स्वभाव अनैसर्गिक समजला जात नाही. पण स्वभावाचे काही पैलू त्या व्यक्तीसाठी त्रासदायी ठरतात, त्याला दोष म्हणतात. विशेष म्हणजे स्वभावदोषामुळे व्यक्तीचे नातेसंबंध तणावपूर्ण होतात, ते कोणाशीही जुळवून घेऊ शकत नाहीत. यामुळे स्वभावदोष असणाऱ्या व्यक्तीला अतिनराश्य, व्यसनाधीनता, व्यवसाय आणि कौटुंबिक पातळीवर अपयश येते.

स्वभाव कसा घडतो?
जन्माला आलेले मूल त्याच्या मूळ स्वभावानुसार वागत असते. हा आनुवंशिकतेवर आणि आरोग्यावर अवलंबून असतो. नंतर संगोपनात येणाऱ्या अनुभवांमुळे त्याच्या स्वभावात बदल घडत जातात. लहानपणी स्थर्य, प्रेम आणि सुरक्षित वातावरण नसले तर मानसिक स्थर्यता कमी होते. सतत टीका करणे, अति काळजी घेणे आणि भित्रे आई-वडील असतील तर मुलातही भित्रेपणा येतो. मुलाचा अपमान करणे, दुर्लक्ष करणे, मारहाण करणे असे प्रकार घडले की तो एकलकोंडा होतो. एकलकोंडय़ा व्यक्तीला इतरांशी जुळवणे शिकवले नाही तर ते संशयी होतात आणि त्यांना कुणावर विश्वास ठेवणे कठीण जाते.

त्यावर काय उपाय करता येतात?
स्वभावामुळे आपल्याला त्रास होत आहे असे मुळात या लोकांना वाटत नाही. इतरांचे वागणे नीट झाले तर मी नीट राहीन असे त्यांना वाटते. त्यामुळे या समस्येचे थेट उपचार करण्याची संधी खूप क्वचित मिळते. स्वभावामुळे झालेले शारीरिक, मानसिक आजार किंवा नातेसंबंधांतील ताण कमी करण्यासाठी मानसोपचार आहेत. समुपदेशन केल्याने स्वभावातील त्रासदायी गुणांना सौम्य करून फायदेशीर गुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला यश मिळण्यासाठी बरीच वष्रे लागतात. मनस्ताप आणि आजार कमी करण्यासाठी औषधेही दिली जातात. पण उपचारात गुण येण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि रुग्ण दोघांकडेही वेळ, प्रामाणिकपणा आणि चिकाटी पाहिजे.
स्वभाव विचित्र आहे म्हणून दुसऱ्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवणे खूप कठीण असते. त्यामुळे आपणच त्या व्यक्तीशी कसे वागावे हे शिकण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न सुटू शकतो. स्वभावामुळे होणारे त्रास व्यक्तीलाच उपचार करून सुटतील आणि ती व्यक्ती मात्र पुढे येत नाही, असे समजून सोडून देऊ नये. निदान त्या व्यक्तीबरोबर कसे राहावे (की कसे राहू नये) याचे मार्गदर्शनही एक योग्य उपाय ठरू शकतो.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com