03 April 2020

News Flash

आपत्कालीन हेल्पलाइन्स

अगदी २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येतो.

हेल्पलाइनची गरज भासते, अशी आणखी एक परिस्थिती म्हणजे, घरातील एखादी व्यक्ती हरवणे. त्या परिस्थितीत सगळेच भांबावून जातात. अशा वेळी अर्थातच प्रथम पोलिसांशी संपर्क साधायचा. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक माहीत आहेच -१००. या क्रमांकावर केव्हाही, अगदी २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येतो. या क्रमांकाशिवाय हरवलेल्या व्यक्तींसंदर्भात मदत मिळवण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाइन्सचे आणखी क्रमांक आहेत –
मुंबई – २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, २२६४१४४९, २२६२०१११.
नवी मुंबई – ७७३८३६३८३६, ७७३८३९३८३९.
ठाणे शहर – २५४४२८२८, २५४४२१२१
मुंब्रा – २५४६२३५५, २५४६८३१५.
डोंबिवली – (०२५१) २८६०१००, ०२५१ २८६०१०१.
कल्याण – (०२५१) २३१४८००.
बदलापूर – (०२५१) २६९०२९७, ०२५१ २६९३८६७.
मुंबईत बसने किंवा ट्रेनने प्रवास करताना आपल्या काही वस्तू हरवतात. अशा वेळी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. त्या आहेत –
बेस्ट – (०२२) २४१२८५९६.
मध्य रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करताना एखादी वस्तू हरवल्यास लगेच त्या स्थानकाच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधायचा आणि तक्रार नोंदवायची. ते शक्य न झाल्यास लोकमान्य टिळक टर्मिनसच्या ‘गहाळ वस्तू विभागा’शी संपर्क साधायचा. त्यांचे हेल्पलाइन क्रमांक – (०२२) ६७४६२६२१, २७४६२६१८. छत्रपती शिवाजी टर्मिनस गहाळ वस्तू विभाग – (०२२) ६७४५५१२७.
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करताना एखादी वस्तू गहाळ झाल्यास आधी त्या रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधून तक्रार दाखल करायची किंवा (०२२) २३००४००० या हेल्पलाइनवर संपर्क साधायचा. आणखी एक पर्याय म्हणजे पश्चिम रेल्वे पोलीस हेल्पलाइन ९८३३३३११११.
लांब पल्ल्याचा ट्रेन प्रवास करणाऱ्या एकटय़ा स्त्रीसाठी रेल्वेने खास हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. तो आहे – १३२२. सामान गहाळ होणे किंवा अन्य तक्रारींसाठी या हेल्पलाइनचा वापर करता येईल.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2016 1:50 am

Web Title: emergency helpline number india
Next Stories
1 आपत्कालीन मदतीसाठी
2 आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन्स
3 प्राणिमित्र-पक्षिमित्र
Just Now!
X