News Flash

IPL 2020: पृथ्वीची ‘शॉ’नदार खेळी; मोडला डीजे ब्राव्होचा विक्रम

पृथ्वीच्या खेळीत ४ चौकार, ४ षटकार

Dream11 IPL 2020 DC vs KKR: कोलकाताविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. शारजाच्या मैदानावरील सामन्यात आधी पृथ्वी शॉ, त्यानंतर ऋषभ पंत आणि अखेरीस श्रेयर अय्यर अशा तिहेरी तडाख्याने कोलकाताच्या गोलंदाजांना अक्षरश: नाकीनऊ आणले. श्रेयस अय्यरने अवघ्या ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा कुटल्या. तर पृथ्वीने ६६ आणि पंतने ३८ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने २२८ धावांचा डोंगर उभारला.

कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय प्रचंड फसला. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. चांगली सुरूवात मिळाल्यानंतर धवन २६(१६) धावांवर बाद झाला. पण पृथ्वी शॉने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने फटकेबाजी सुरूच ठेवली. पृथ्वीने आपले अर्धशतक झळकावले, पण मोठा फटका खेळताना तो ६६(४१) धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. पृथ्वीचे हे IPLमधील सहावे अर्धशतक ठरले. ५ अर्धशतके नावावर असलेल्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत पृथ्वीने ही कामगिरी केली.

पृथ्वी बाद झाल्यावर ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी केली. तो ५ चौकार आणि एका षटकारासह ३८(१७) धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा ठोकल्या. त्याने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. या फटकेबाजी जोरावर दिल्लीने २० षटकात ४ बाद २२८ धावा केल्या. रसेलने सर्वाधिक २ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 10:32 pm

Web Title: ipl 2020 dc vs kkr prithvi shaw beats dwayne bravo in most fifties in ipl history vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: मॉर्गन-त्रिपाठीची झुंज अपयशी; दिल्लीकडून कोलकाता पराभूत
2 IPL 2020 : खेळाडूंना बुकींकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न
3 IPL 2020 : RCB च्या विजयात पडीकलचा मोलाचा वाटा, अनोख्या विक्रमाची नोंद
Just Now!
X