कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याविरोधात आम आदमी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती. तर आज केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी आपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बिंदू चौक येथील रक्तदान शिबिरात बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आपने आज राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून केजरीवालांच्या कार्याला मानणाऱ्या नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहान केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. केजरीवालांची अटक चुकीची असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचे उत्तर मतदार दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीश्चंद्र कांबळे, दिलीप पवार, रमेश मोरे यांनी शिबीरस्थळी भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, समीर लतीफ, आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood donation by aap in kolhapur in support of kejriwal ssb