कोल्हापूर : येथील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त खडूमध्ये भगवान गौतम बुद्धांचे शिल्प साकारून अभिवादन केले आहे. अवघ्या दीड इंच खडूमध्ये कला अविष्कारातून भगवान गौतम बुद्ध यांचे बोधिवृक्षाखाली बसलेले शिल्प साकारले आहे. पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असणाऱ्या कांबळे यांनी आजवर अनेक महापुरुष,नेते यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे, श्रीराम लक्ष्मण, सीता, हनुमान, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल रुक्मिणी आदी देवदेवतांची हुबेहूब चित्रं खडूमध्ये कोरली आहेत. खडू बरोबरच अंघोळीच्या साबणामध्येही त्यांनी कोरलेल्या शिल्पकृती विलोभनीय आहेत.  जयंती, पुण्यतिथी उत्सवाच्या वेळेला शालेय फलकावर फक्त खडूच्या सहायाने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha sculpture made of with one and a half inch chalk in kolhapur zws
First published on: 23-05-2024 at 18:27 IST