कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने सोमवारी अक्षरशः झोडपून काढले. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये काही प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडे कोल्हापुरात उष्मा वाढला होता. मोठ्या पावसाची अपेक्षा केली जात होती. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस तासभर झाल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. तर अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

हेही वाचा – कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील जखमी; उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा

हेही वाचा – कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी लाखभर भाविक

कोल्हापूर शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने लोकांची त्रेधातीरपिट उडाली. पन्हाळागडावर जाणाऱ्या रोडवर झाड मोटारीवर कोसळले. विविध ठिकाणी झाडे कोसळली. तसेच वीजपुरवठासुद्धा काही काळ खंडित झाला होता. कसबा बावडा वडणगे रस्त्यावर झाडांसह लाईटचे पोल पडले. वडणगे स्मशानभूमीचे छत वादळाने पडले. आजपर्यंत कधी पाऊस पाहिला नाही असा पाऊस झाल्याचेसुद्धा शेतकरी सांगत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain lashed kolhapur the tree fell on the car ssb