Premium

VIDEO : सचिन-विराट नव्हे तर, ‘हा’ खेळाडू आहे भारताचा सर्वोत्तम फलंदाज, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने सांगितले नाव

Junaid Khan Statement : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज जुनैद खानने भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे? याबद्दल सांगितले आहे. रोहित शर्मा हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे, असे त्याचे मत आहे.

Pakistan cricketer Junaid Khan Rohit Sharma is India's best batsman
खानच्या मते रोहित शर्मा भारताचा सर्वोत्तम फलंदाज (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Junaid Khan Says Rohit Sharma is India’s best batsman : अनेकदा भारताच्या महान फलंदाजांबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली हे नाव प्रत्येकाच्या मनात येते. पण, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खानचे या बाबतीत थोडे वेगळे वेगळे मत आहे. वास्तविक, जुनैद खान मानतो की भारताचा महान फलंदाज सचिन किंवा विराट नसून रोहित शर्मा आहे.होय, जुनैदने हिटमॅनला भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. यामागचे कारणही त्यानी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जुनैद खान म्हणाला, “माझ्या मते रोहित शर्मा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्याच्याकडे सर्व शॉट्स आहेत. म्हणूनच ते त्याला हिटमॅन असेही म्हणतात. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक २६४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन-तीन द्विशतक झळकावणे देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्याने सर्वाधिक षटकारही मारले आहेत. त्यामुळे माझ्या मते रोहित शर्मा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे.”

फक्त जुनैद खानच नाही, तर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी रोहितला भारताचा सर्वात मजबूत फलंदाज मानले आहे. कारण नुकत्याच झालेल्या विश्वचषकादरम्यान त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात फलंदाजी करत भारतीय संघाला झंझावाती सुरुवात करून दिली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याने वेगवान धावा करून जास्तीत जास्त धावा कराव्यात, जेणेकरून संघातील इतर फलंदाज मोकळेपणाने खेळू शकतील अशी हिटमॅनची इच्छा होती.

हेही वाचा – VIDEO : रिंकू सिंगने १०० मीटर लांब षटकार कसा मारला? जितेश शर्माने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा

हिटमॅनची ही शैली पाहून सर्व दिग्गजांनी सांगितले होते की, जर रोहितने इतका निस्वार्थीपणे खेळ केला नसता आणि वैयक्तिक टप्पे बघितले नसते, तर त्याने विश्वचषकात नक्कीच तीन-चार शतके झळकावली असती. हे देखील जाणून घ्या की २०१९ च्या विश्वचषकात हिटमॅनने पाच शतके झळकावली होती. सध्या रोहित विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७ वेळा हा पराक्रम केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to former pakistan cricketer junaid khan rohit sharma is indias best batsman vbm

First published on: 02-12-2023 at 14:27 IST
Next Story
VIDEO : रिंकू सिंगने १०० मीटर लांब षटकार कसा मारला? जितेश शर्माने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा