Controversy arose due to Ravindra Jadeja’s LBW out : हैदराबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचे चौथे कसोटी शतक हुकले. इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूटने रवींद्र जडेजाला शतक पूर्ण करू दिले नाही आणि ८७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. हैदराबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आपले चौथे कसोटी शतक पूर्ण करेल आणि टीम इंडिया ५०० धावांचा टप्पा ओलांडेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती, परंतु दोन्हीपैकी एकही काम पूर्ण होऊ शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जडेजाच्या आऊट नॉटवरुन निर्माण झाला गोंधळ –

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाला वादग्रस्तरित्या एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले. त्यानंतर पंचांच्या या निर्णयाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रिप्लेमध्ये असे दिसून आले की, चेंडू पॅडला आदळण्यापूर्वी बॅटच्या पातळ काठावर आदळला होता, परंतु तिसऱ्या पंचाने पॅडचा विचार केला आणि रवींद्र जडेजाला वैयक्तिक ८७ धावांच्या खेळीनंतर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. रवींद्र जडेजाचे चौथे कसोटी शतक अवघ्या १३ धावांनी हुकले. सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की रवींद्र जडेजा आऊट होता की नॉट आउट?

भारताने पहिल्या डावात घेतली १९० धावांची आघाडी –

टीम इंडियाने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध १९० धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ८७ धावा केल्या. रवींद्र जडेजाशिवाय केएल राहुलने ८६ धावांची आणि यशस्वी जैस्वालने ८० धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. टॉम हार्टले आणि रेहान अहमदने २-२ विकेट्स घेतल्या. जॅक लीचने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले होते.

हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १९० धावांची आघाडी, राहुलनंतर जडेजाचेही हुकले शतक

पहिल्या डावात फलंदाजीला उतरतलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा (७५ चेंडू) जोडल्या, त्यानंतर रोहित शर्मा (२४) तेराव्या षटकात जॅक लीचच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणारा यशस्वी जैस्वाल २४व्या षटकात जो रूटचा बळी ठरल्याने डाव काही काळ स्थिरावला होता. जैस्वालने वेगवान फलंदाजी करत ७४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy arose due to ravindra jadejas lbw out in ind vs eng 1st test in vbm
First published on: 27-01-2024 at 12:15 IST