फिफा विश्वचषक फायनल २०२२ मधील अंतिम सामना अर्जेंटिना आणि सध्याचा चॅम्पियन फ्रान्स यांच्यात होत आहे. या सुपरहिट सामन्यात लिओनेल मेस्सी एका बाजूला तर एमबाप्पे दुसऱ्या बाजूला आहे. फ्रान्सला ८०व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ती स्टार खेळाडू किलियन एमबाप्पेने घेतली.गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले.

त्याने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करून सामना बरोबरीत आणला.फ्रान्सचे अप्रतिम पुनरागमन केले आहे. त्यांनी दोन मिनिटांत स्कोअर २-० वरुन २-२ असा केला, ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. एमबाप्पेने सलग दोन गोल करत संघासाठी शानदार पुनरागमन केले आहे. त्याने ८०व्या आणि नंतर ८१ व्या मिनिटाला गोल करून सामन्यात उत्साह वाढवला.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट

एमबाप्पेच्या हॅट्ट्रिकमुळे गुणसंख्या ३-३ अशी बरोबरीत

हा फायनल सामना सुपर डुपर हिट होत आहे. येथे सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ११८व्या मिनिटाला एमबाप्पेला पेनल्टी मिळाली पण त्याने पुन्हा गोल करत सामन्यात स्कोअर ३-३ असा केला. गोलच्या हॅट्ट्रिकमुळे अतिरिक्त वेळ पुन्हा रोमांचक झाला.

मेस्सीची जादू पुन्हा चालली –

१०८व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत संघासाठी तिसरा गोल करत अर्जेंटिना संघाला ३-२अशी आघाडी मिळवून दिली. यासह मेस्सीने या विश्वचषकाच्या मोसमातील ७ वा गोल केला आहे.

वाढीव वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी –

वाढीव वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले आहेत. अर्जेंटिना-फ्रान्स २-२ बरोबरीत आहे. ९६व्या मिनिटाला फ्रान्सच्या संघाने एक बदल केला. त्याने मिडफिल्डर अॅड्रियन रॅबिओटला बाहेर बसवले. त्याच्या जागी मिडफिल्डर युसूफ फोफानाला पाचारण करण्यात आले आहे.