दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली असून बुधवारी क-गटाच्या लढतीत अर्जेटिना आणि पोलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आणि पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोवस्की या तारांकित आघाडीपटूंच्या कामगिरीकडे सर्वाची नजर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जेटिनाला यंदा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांना सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाने १-२ असा पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, या धक्क्यातून सावरत अर्जेटिनाने दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोवर २-० अशी मात केली आणि विश्वचषकातील आव्हान कायम ठेवले. अर्जेटिनाला सर्वाधिक गरज असताना मेसीने आपला खेळ उंचावला. अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या मेसीने एक गोल आणि एक गोलसाहाय्य करत अर्जेटिनाला मेक्सिकोविरुद्ध विजय मिळवून दिला. मात्र, पोलंडविरुद्धही त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 poland vs argentina match preview zws
First published on: 30-11-2022 at 05:58 IST