Sarfaraz tries to sledge Shoaib Bashir England spinner reaction in hindi : भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथी कसोटी रांची येथे खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर जो रुटच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३०२ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या शेवटी सर्फराझ खानने पाकिस्तानी वंशाचा खेळाडू शोएब बशीरची खिल्ली उडवलेली एक मजेदार घटनाही पाहायला मिळाली. यानंतर शोएब बशीरही मागे हटला नाही आणि अचूक उत्तर दिले. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑली रॉबिन्सनच्या विकेटनंतर शोएब बशीर फलंदाजीला आला होता. त्यावेळी सिली पॉइंटवर उभा असलेला सर्फराझ खानने बशीरची खिल्ली उडवताना म्हणाला, ‘इसको हिंदी नहीं आती'(याला हिंदी येत नाही). त्यानंतर बशीरने अचूक उत्तर दिले. तो म्हणाला, ‘मुझे थोडी-थोडी हिंदी आती है’ (मला थोडीफार हिंदी येते). बशीर जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. त्याने २ चेंडूंचा सामना केला. यानंतर खातेही न उघडता रवींद्र जडेजाने बशीरला आपल्या जाळ्यात अडकवले.

दोघांनी याच मालिकेतून केले पदार्पण –

सर्फराझ खान आणि शोएब बशीर या दोन्ही युवा खेळाडूंनी या मालिकेत पदार्पण केले आहे. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी सर्फराझ खानला खूप वाट पाहावी लागली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत सर्फराझने पदार्पण केले आणि दोन्ही डावात शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले.

हेही वाचा – Ranji Trophy : ‘चांगली कामगिरी केली आहेस, पण…’ पहिले शतक झळकावण्यापूर्वी सर्फराझने मुशीरला काय सल्ला दिला होता?

चौथ्या कसोटीची सुरुवात इंग्लंडसाठी निराशाजनक झाली. इंग्लिश संघाने केवळ ११२ धावांवर आपले ५ फलंदाज गमावले होते. यानंत जो रुटने आपले ३१ कसोटी शतक झळकावत संघाचा डाव सावरला. त्यामुळे इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३५३ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He doesn not know hindi sarfaraz tries to sledge shoaib bashir england spinner reaction in hindi vbm
First published on: 24-02-2024 at 14:05 IST