Musheer Khan revealed Sarfraz’s advice : सर्फराझ खानने कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण केले होते. त्याच्याप्रमाणेच धाकटा भाऊ मुशीर खाननेही मुंबईकडून खेळताना रणजी करंडकातील पहिले शतक झळकावले. मुशीरने आपल्या तिसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात पहिले शतक पूर्ण केले. मुशीरने हे शतक रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध झळकावले. या शतकानंतर मुशीरने सांगितले की त्याचा मोठा भाऊ सर्फराझने त्याला काय सल्ला दिला होता.

‘खरे क्रिकेट आता सुरू होईल’ – सर्फराझ खान

मुशीरने खानने मोठा भाऊ सर्फराझने त्याला काय सल्ला दिला होता, याबाबत सांगितले. १८ वर्षीय मुशीरने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ सर्फराझने त्याला सांगितले की, ‘तू आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहेस. पण खरे क्रिकेट आता सुरू होईल आणि त्यासाठी तुला तयार राहावे लागेल. आता तुला खेळपट्टीवर टिकून राहायचे आहे आणि धावा करत राहायच्या आहेत.’

मुशीरच्या या शतकाचे महत्त्वही आणखी वाढते. कारण या सामन्यात एकेकाळी मुंबई संघ अडचणीत दिसत होती. संघाच्या ९० धावांवर चार विकेट पडल्या होत्या. यानंतर मुशीरने नाबाद शतक झळकावून मुंबईचा डाव सावरला. खान कुटुंबासाठी गेले काही आठवडे चांगले गेले आहेत. मोठा भाऊ सर्फराजने राजकोट कसोटीत इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. बडोद्याविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात दिवसाचा खेळ संपल्यानंतर मुशीर म्हणाला, दोन्ही भावांची चांगला वेळ सुरु आहे. मी जास्त विचार करत नाही.

हेही वाचा – WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष

बडोदाविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने पहिल्या सत्रात पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अजिंक्य रहाणे आणि शम्स मुलाणी यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर सर्व जबाबदारी मुशीर यांच्यावर आली. त्याने हुशारीने फलंदाजी केली. मुशीरने सूर्यांश शेडगेसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि त्यानंतर यष्टीरक्षक हार्दिक तमोरसह नाबाद १०६ धावा जोडल्या. त्यामुळे मुंबई संघाला पहिला दिवसअखेर ९० षटकानंतर ५ बाद २४८ धावा केल्या. सध्या मुशीर खान २१६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १२८ धावांवर नाबाद आहे. त्याचबरोबर हार्दिक तमोरने १६३ चेंडूत ३० धावांवर नाबाद आहे.