200 times more people registered for India Pakistan match tickets : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा सुरू होण्यास अद्याप तीन महिन्यांहून अधिक कालावधी आहे, परंतु या विश्वचषकाअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा शानदार सामना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. एका अहवालानुसार, आयसीसीने जाहीर केलेल्या तिकिटांपेक्षा २०० पट अधिक लोकांनी तिकीट मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे लाखो लोक अमेरिकेत खेळलेली ही महायुद्ध पाहण्यापासून वंचित राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. एका अहवालानुसार, आयसीसीने जाहीर केलेल्या तिकिटांपेक्षा २०० पट अधिक लोकांनी तिकीट मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. चाहत्यांना कोणत्याही किंमतीत या सामन्याची तिकिटे खरेदी करायची आहेत आणि त्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहायचा आहे. टी-२० विश्वचषक सुरू होण्यास अद्याप तीन महिन्यांहून अधिक कालावधी आहे. मात्र वर्ल्डकपसाठी तिकीट खरेदीसाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे.

लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीने विश्वचषकाच्या तिकिटांची संख्या जाहीर केली. या तिकिटांवर २०० पट अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. यामुळे बहुतेक लोकांची निराशा होईल. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये फक्त ३४ हजार प्रेक्षक बसून सामना पाहू शकणार आहेत.

हेही वाचा – Sachin Tendulkar : खांद्यापासून हात नसलेल्या फलंदाजाला सचिनकडून खास भेट; अखेर ‘तो’ शब्द पाळला

१६ पैकी ९ सामन्यांसाठीचे एकही तिकीट शिल्लक नाही –

त्याचबरोबर स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाखापर्यंत वाढवली तरी सामन्याची सर्व तिकीट विकली जातील. कारण भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यामध्ये प्रचंड क्रेझ असते. अहवालानुसार, टी-२० विश्वचषकाचे १६ सामने अमेरिकेत होणार आहेत, त्यापैकी ९ सामन्यांची कोणतेही तिकीटं शिल्लक नाहीत. अपेक्षेप्रमाणे ९ जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व! भारताने २१९ धावांवर गमावल्या ७ विकेट्स, शोएब बशीर ठरला काळ

भारत-पाकिस्तानचे सर्व गट सामने अमेरिकेत होणार –

टी-२० विश्वचषक यूएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेट जोन्स म्हणाले की, ‘प्रत्येक विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे सामने खूप रोमांचक होतात. मला वाटते की हे दोन देश युनायटेड स्टेट्समध्ये येताना पाहणे खरोखर छान आहे.’ ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान त्यांचे सर्व गट सामने युनायटेड स्टेट्समध्ये खेळतील आणि निश्चितपणे देशात राहणारे भारतीय सामन्यांसाठी प्रचंड गर्दी करतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan t20 world cup 2024 match tickets over subscribed by 200 times vbm