KKR vs SRH IPL 2024 Final Match Highlights: IPL 2024 मध्ये 26 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आणि तिसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला. अंतिम सामन्यात केकेआरने दमदार कामगिरी केली. या सामन्यात केकेआरने एकतर्फी खेळ करत हैदराबादचा लाजिरवाणा पराभव केला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच कोलकाता संगाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि हैदराबाद संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी नाही दिली. कोलकाताकडून झालेल्या दारूण पराभवानंतर, काव्या मारनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ती स्टँडवर उभी राहून खूप भावूक झालेली दिसली आणि नंतर रडत डोळे पुसतानाही दिसली.

आयपीएल २०२४ च्या फायनलपर्यंतच्या अप्रतिम प्रवासानंतर, हैदराबादला आयपीएल फायनलमध्ये कोलकाताकडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला. हैदराबादची मालकीण काव्या मारनही हा पराभव पाहून रडताना दिसली तिच्या डोळ्यातून अश्रू आले. पण काव्या तिचे हे अश्रू लपवले आणि काव्या मागे वळून तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसताना दिसली आणि नंतर पुन्हा वळून आपल्या संघाचे प्रोत्साहन वाढवताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

केकेआरकडून आंद्रे रसेल (१९ धावांत ३ विकेट) सह सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि व्यंकटेश अय्यरचे (नाबाद ५२) शानदार अर्धशतक केले. ज्यामुळे केकेआरसाठी हा विजय अधिक सोपा ठरला. ५७ चेंडू शिल्लक असताना तिसऱ्यांदा केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. हैदराबादला १८.३ षटकांत ११३ धावांत गुंडाळल्यानंतर, कोलकाताने अवघ्या १०.३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ११४ धावा करून एकतर्फी विजय मिळवला.

व्यंकटेश अय्यरने केवळ २६ चेंडूंत नाबाद ५२ धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार लगावले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावा करताना पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली.