Super 4 गटातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानची झुंज मोडून काढत, ३ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात, शोएब मलिकने अफताब आलमच्या गोलंदाजीवर एक षटकार व चौकार ठोकत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान मलिकने नाबाद ५१ धावांची खेळीही केली.

मात्र सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तानच्या अफताब आलमला अश्रु अनावर झाले नाहीत. सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यानंतर अफताब आलमला रडू कोसळलं. यावेळी शोएब मलिकने लगेच अफताबपाशी जात त्याचं सांत्वन केलं, यावेळी शोएब मलिकने दाखवलेल्या खेळ भावनेचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

 

अफगाणिस्तानकडून फिरकीपटू राशिद खानने पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडण्याचं काम केलं. अखेरच्या षटकात विजयासाठी दहा धावा आवश्यक असताना माझ्यावर थोडसं दडणप होतं, पण हे शवटचं षटक आहे हे मी स्वतःलाच सांगत होतो. त्यातच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही खूप चांगला मारा केला. गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी सुधारते आहे, अशा शब्दांत शोएब मलिकनेही अफगाणिस्तानच्या संघाचं कौतुक केलं.