PCB chief Zaka Ashraf on IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. उभय संघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. तेव्हापासून, दोन कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. आता भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबद्दल पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

मात्र, दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे गेल्या काही काळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. २००८ च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी पत्रकार परिषदेत एक मोठं विधान केले आहे.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Indian domestic cricketer salary
BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटने अश्रफच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘जिथंपर्यंत भारत-पाकिस्तानच्या द्विपक्षीय मालिकेचा संबंध आहे, दोन्ही बोर्ड एकमेकांशी खेळण्यास तयार आहेत. शासनाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. या वक्तव्यानंतर बीसीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा – SL vs ZIM 3rd ODI : वानिंदू हसरंगाचा मोठा पराक्रम! झिम्बाब्वेविरुद्ध सात विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग

सप्टेंबर २०२३ मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, बीसीसीआयने यापूर्वी निर्णय घेतला होता की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद संपवत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका होणार नाही. पत्रकारांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले होते, ‘बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद, सीमेपलीकडून होणारे हल्ले आणि घुसखोरी संपवत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी द्विपक्षीय सामने खेळणार नाही. मला वाटतं देशाच्या आणि लोकांच्या भावनाही समान आहेत.’

हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : शिवम दुबेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताचा शानदार विजय, अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनी मात

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सर्वोच्च भारतीय सुरक्षा जवान शहीद झाल्यानंतर हे वक्तव्य आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा नुकताच पाकिस्तानशी सामना झाला होता. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला. न्यूयॉर्कमध्ये ९ जून रोजी २०२४ टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने येतील. त्यासाठीही स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले जाण्याची शक्यता आहे.