प्रो-कबड्डीत अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या यू मुम्बाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात तामिळ थलायवाजने यू मुम्बाचा ३८-३५ असा पराभव केला. एका क्षणापर्यंत सामन्यात यू मुम्बाने आपली आघाडी कायम ठेवली होती. मात्र शेवटच्या मिनीटात सुरिंदर सिंहने बचावात केलेली चुक यू मुम्बाला चांगलीच महागात पडली. याचा फायदा घेत तामिळ थलायवाजने यू मुम्बाला पराभूत केलं.

यू मुम्बाने आजच्या सामन्यात कर्णधार अनुप कुमार आणि काशिलींग अडके या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली. याऐवजी जोगिंदर नरवालने मुम्बाच्या संघाचं नेतृत्व केलं. अनुप आणि काशिलींगच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुम्बाच्या संघाने अनपेक्षितरित्या चांगली कामगिरी केली. चढाईत दर्शन कादियान आणि श्रीकांत जाधव यांनी संघांसाठी चांगले गूण कमावले. दर्शनने ८ तर श्रीकांतने ७ गुणांची कमाई करत मुम्बाला आघाडी मिळवून दिली. त्याला बदली खेळाडू मोहन रामनने ५ तर शब्बीर बापूने २ गुण मिळवत चांगली साथ दिली.

suniel shetty and karisma kapoor dance on famous bollywood songs
Video : झांझरिया…२८ वर्षांनी सुनील शेट्टी-करिश्मा कपूरचा पुन्हा एकदा जबरदस्त डान्स, माधुरी दीक्षितने मारल्या शिट्ट्या
Nuwan Thushara Reaction on Hardik Pandya Misfielding Video
IPL 2024: हार्दिकची मिसफिल्डिंग; तुषारा असा झाला व्यक्त, VIDEO होतोय व्हायरल
salman khan Orry in jamnagar
Video: सलमान खान, ऑरीसह बॉलीवूडकर पुन्हा एकदा जामनगरला रवाना; नेमकं कारण काय? जाणून घ्या
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs KKR: पहिल्या डावात आमचा खेळ अतिशय सुमार- पॉन्टिंगने व्यक्त केली नाराजी

बचावफळीत सुरिंदर सिंहने ६ गुणांची कमाई करत सुरुवातीच्या सत्रात आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. त्याला दिपक यादवने २ तर जोगिंदर नरवालने १ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र सामन्यातील तामिळ थलायवाजच्या शेवटच्या चढाईत सुरिंदरने अजय ठाकूरला मध्य रेषेवर पकडण्याची अक्षम्य चुक केली. ज्याचा फायदा घेत तामिळने २ गुणांच्या फरकाने मुम्बाचा पराभव केला.

तामिळ थलायवाजकडून कर्णधार अजय ठाकूरने सर्वाधीक १६ गुणांची कमाई केली. त्याला के. प्रपंजनने ६ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही चढाईपटूंनी मोक्याच्या क्षणी तामिळ थलायवाजचं आव्हान सामन्यात कायम राखण्याचं काम केलं. अजय आणि प्रपंजनच्या मेहनतीला तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनीही तितकीच चांगली साथ देत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.