मुंबई : मुंबई संघाचा अष्टपैलू शिवम दुबे आणि चित्रफीत विश्लेषक यांना करोनाची लागण झाली आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला १३ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून दुबेच्या जागी साईराज पाटीलची मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे.

डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा २८ वर्षीय दुबे भारतासाठी एक एकदिवसीय, १३ ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा रणजी करंडकासाठी ‘क’ गटात समावेश करण्यात आला असून यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, हैदराबाद आणि उत्तराखंड हे संघही आहेत. मुंबईचे साखळी सामने कोलकाता येथे होणार असून मंगळवारी मुंबईचा संघ यासाठी रवाना होणार आहे. याव्यतिरिक्त बंगाल संघातील सात जणांनाही करोनाची बाधा झाली आहे.

adhirranjan choudhari
दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी; १३ राज्यांत लोकसभेच्या ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान
Suresh Raina interview on lantop,
IPL 2024 : ‘ज्या संघांनी पार्ट्या केल्या त्यांनी अजून आयपीएल जिंकली नाही’, सुरेश रैनाने नाव घेता ‘या’ संघांना डिवचले
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?