कोरियातील चँगवॉन येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर पिस्तूल प्रकारात भारताचा अव्वल नेमबाज जितू रायने कांस्यपदक पटकावले आहे.
अंतिम फेरीत जितूने १८१.१ गुण मिळवले. या प्रकारात कोरियाच्या जीन जोंगोह याने सुवर्ण तर म्यानमारच्या नौग ए तून याने रौप्यपदक मिळवले. यापूर्वी शनिवारी या स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंडेलाने कांस्यपदकावर मोहोर उमटवत रिओ ऑलिंपिकसाठीचे तिकीट निश्चित केले होते.