Mohammad Rizwan getting out due to a wristband in the second Test against Australia : पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान फॅशन करणे महागात झाले. तो रिस्टबँड घालून फलंदाजीला आला होत. हा रिस्टबँड त्याच्या आऊट होण्याचे कारण ठरले. पॅट कमिन्सचा चेंडू रिस्टबँड लागला आणि यष्टिरक्षकाकडे गेला. या रिस्टबँडचा पट्टा रिझवानच्या ग्लोव्हजच्या संपर्कात होता, ज्याच्या मदतीने रिझवानने बॅट पकडली होती, ज्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.

मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर निराश झाला आणि हसत राहिला, पण पॅव्हेलियनमध्ये परतण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. रिझवानच्या आऊट होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी पाकिस्तानच्या डावाच्या ६१व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा पाकिस्तानचा संघ ३१७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि संघाची धावसंख्या ५ बाद २१९ धावा अशी होती.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

IND vs SA : ‘येथे आल्यानंतर तुम्हाला…’, सुनील गावसकरांनी सांगितले भारताचे पराभवाचे महत्त्वाचे कारण

मालिकेत बरोबरी साधण्यासाठी फक्त ९८ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने शॉर्ट-पिच चेंडू टाकला जो रिझवानच्या बॅटला लागला नाही. मैदानावरील पंचांनी ऑस्ट्रेलियाचे झेल घेण्याचे अपील नाकारले, तर कमिन्सने तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि विकेट मिळवली.
तिसरे पंच, रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्यांचा वेळ घेतला आणि वेगवेगळ्या कॅमेरा अँगलमधून ही घटना अनेक वेळा पाहिली. हॉटस्पॉट तंत्रज्ञान विकेटची पुष्टी करू शकले नाही. यानंतर इलिंगवर्थ स्नीकोमीटरकडे वळले, ज्याने पुष्टी केली की चेंडूचा रिझवानच्या मनगटाच्या पट्टीला स्पर्श झाला होता. मैदानावरील पंचांचा निर्णय उलटताच रिझवानने पंचांशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि आपली निराशा व्यक्त केली.

हेही वाचा – IND vs SA : ‘येथे आल्यानंतर तुम्हाला…’, सुनील गावसकरांनी सांगितले भारताचे पराभवाचे महत्त्वाचे कारण

कमिन्सने पाच विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत ७९ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. ३१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २३७ धावांवर गारद झाला आणि सामना गमावला. पाकिस्तानच्या शेवटच्या पाच विकेट १८ धावांत पडल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने दोन्ही डावात प्रत्येकी पाच बळी घेतले.