Rohit Sharma entering Mumbai at night after winning the Asia Cup: आशिया चषक २०२३ चा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यामुळे टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, पाच वर्षांनंतर, भारताने अशी स्पर्धा जिंकली आहे, जिथे दोनपेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. या विजयामुळे भारतीय चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. रोहित शर्मा रविवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचला. त्यानंतर तो कार चालवत घराजवळ पोहोचला, तेव्हा चाहत्यांना पाहून त्याला आश्चर्य वाटले. रोहितला पाहताच चाहत्यांनी आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्याच्यासोबत फोटो काढायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहितने लगेचच चाहत्यांना होकार दिला आणि गाडीतून बाहेर आला. रोहितने चाहत्यांसोबत काढले फोटो - रोहित टी-शर्ट आणि शॉट्समध्ये दिसत होता. त्याने सगळ्यांना वेळ देऊन फोटो काढले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी रोहितसोबत फोटोही काढले. दरम्यान, यावेळी ते लोक कसे आले, असा सवाल भारतीय कर्णधाराने केला. एका कॅमेरामनने उत्तर दिले की, ते फक्त तुमच्यासाठीच आलो आहे. हेही वाचा - Team India: इशान आणि विराटला एकमेकांची नक्कल करताना पाहून इतर खेळाडूंना आवरले नाही हसू, VIDEO होतोय व्हायरल रोहितला नेहमीच आठवेल आशिया कपचा विजय - भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. त्याने असे प्रयत्न दीर्घकाळ स्मरणात राहतील असे सांगितले. मोहम्मद सिराजने सात षटकांत २१ धावा देत सहा विकेट्स घेतल्या, ज्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव ५० धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात हे लक्ष्य एकही गडी न गमावता ६.१ षटकांत पूर्ण केले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, “ही चांगली कामगिरी होती. अंतिम फेरीत असे खेळणे खूप छान होते. यावरून संघाची मानसिकता दिसून येते. अशी कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील."