Delhi Capitals vs Rajasthan Royals Match Highlights: दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे फटके खेळण्यात साथ दिली, पण तो फार काळ मैदानात टिकू शकला नाही. दिल्लीने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ २०१ धावाच करू शकला आणि दिल्लीने २० धावांनी विजय नोंदवला.

संजू सॅमसनची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. संजू सॅमसन मैदानात शेवटपर्यंत टिकून राहणं राजस्थानसाठी महत्त्वाचं होतं. मुकेश कुमारच्या १५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर संजू मोठा फटका खेळायला गेला. पण सीमारेषेजवळ उभा असलेला शाई होपने त्याचा झेल टिपला. पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्याचे राजस्थानचे मत होते. पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले. या निर्णयानंतर संजू सॅमसन पंचांशी बोलताना दिसला. त्याने पुन्हा रिव्ह्यू घेण्याचाही प्रयत्नही केला पण तोवर वेळ निघून गेली होती. संजूला अखेरीस ४६ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८६ धावा करत मैदानाबाहेर जावे लागले. संजू बाद झाला तेव्हा संघाला २६ चेंडूत ६० धावांची आवश्यकता होती. हे लक्ष्य गाठणे अवघड होतेच पण सोबतच संघाचे दोन महत्त्वाचे फलंदाज ध्रुव जुरेल आणि शेमरॉन हेटमायर आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हते, ज्याचा संघाला मोठा फटका बसला.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
भाजपाला दिल्ली दूरच... आपने दशकभर वर्चस्व कसं राखलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?

दिल्लीने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल ४ धावा तर बटलर १९ धावा करत बाद झाला. संजू सॅमसनने संघाचा डाव सावरत ८६ धावांची विस्फोटक खेळी केली, पण विजय मिळवून देऊ शकला नाही. तर रियान परागने २२ चेंडूत २७ धावांची खेळी केली पण मोठी खेळी करू शकला नाही. शुभम दुबे १२ चेंडूत २५ धावांची शानदार खेळी केली. पण संजू बाद झाल्यानंतरही तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. तर फरेरिया, अश्विन स्वस्तात बाद झाले. पॉवेलने काही फटके खेळले पण मुकेश कुमारने त्याला अखेरच्या षटकात झेलबाद केले.

दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि रसिख दर यांनी १-१ विकेट मिळाली.

दिल्लीने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला करताना २२१ धावांचा डोंगर उभारला. जेक फ्रेझरने नेहमीप्रमाणे झटपट सुरूवात केली. तर अभिषेक पोरेलने त्याला चांगली साथ दिली. जेकने २० चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५० धावा केल्या. तर अभिषेक पोरेलने ३६ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह शानदार ६५ धावा केल्या. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने २० चेंडूत ४१ धावा केल्या. तर गुलबदिननेही १९ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे संघाची धावसंख्या २०० पार गेली.

राजस्थानचे गोलंदाज आज चांगलेच महागात पडले. बोल्टने ४८ धावा देत १ विकेट, संदीप शर्माने ४२ धावा देत १ विकेट, चहलने ४८ धावा देत १ विकेट तर आवेशने ४२ धावा देत एकही विकेट नाही घेतली. संघासाठी अश्विन एकमेव गोलंदाज होता, ज्याने २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

Story img Loader